जलाशयांचा समृद्ध वारसा असलेल्या बारवांची अवस्था बिकट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नाशिकः ऐतिहासिक अन्‌ जलाशयांचा समृद्ध वारसा असलेल्या बारवांची अवस्था बिकट बनली आहे. नांदूरनाक्‍यावरील, सिन्नर-अकोले रस्त्यावरील शेवरे, पेमगीर, चांदवड अन्‌ किल्ल्यांवरील बारव अखेरच्या घटका मोजताहेत. दुर्लक्षाबरोबर कचऱ्यांनी बारवांचे अस्तित्व निरुपयोगी झाले. 

नाशिकः ऐतिहासिक अन्‌ जलाशयांचा समृद्ध वारसा असलेल्या बारवांची अवस्था बिकट बनली आहे. नांदूरनाक्‍यावरील, सिन्नर-अकोले रस्त्यावरील शेवरे, पेमगीर, चांदवड अन्‌ किल्ल्यांवरील बारव अखेरच्या घटका मोजताहेत. दुर्लक्षाबरोबर कचऱ्यांनी बारवांचे अस्तित्व निरुपयोगी झाले. 

जलाशयांच्या काठावर नागरी वसाहती वाढत गेल्याचा जगभर इतिहास आहे. नैसर्गिक जलस्त्रोत उपलब्ध नसलेल्या ठिकाणी पाण्याचा शोध आड, विहीर, बारवच्या माध्यमातून घेतला गेला. बारव हा केवळ भारतात आढळणारा सार्वजनिक जलव्यवस्थापनाचा व स्थापत्यशास्त्राचा एक अद्‌भूत नमुना आहे. गुजरातमध्ये उत्खननात तीन हजार वर्षांपूर्वी बारव सापडली. मोहेंजोदडो-हडप्पा उत्खननात सापडलेली साडेपाच हजार वर्षांपूर्वीची सार्वजनिक स्नानगृहेही बारवांची आद्य रूपे मानली गेलीत. महाराष्ट्र, गुजरातप्रमाणेच राजस्थान, कर्नाटक पासून उत्तर प्रदेशात बारवांची रेलचेल राहिली.
 महाराष्ट्रात सहाव्या शतकापासून बारवांची बांधकामे वाढल्याची नोंद इतिहास आढळते. यादवकाळात बारवा बांधल्या गेल्या. बारव बांधकामाची परंपरा महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्यापर्यंत टिकून राहिली. अहिल्याबाई होळकर यांनी देशात काशीमार्गावर पांथस्थ अन्‌ प्राण्यांसाठी बारवांची निर्मिती केली. बारव म्हणजे विशिष्ट प्रकारे बांधलेली पायऱ्यांची विहीर. थेट पाण्यापर्यंत सहज पोहोचता येईल, अशी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाण्याच्या अतिउपश्‍यामुळे भूजलाचा साठा दीड ते दोन हजार फूटापर्यंत खोल गेला आहे. अशाही परिस्थितीत अस्तित्वाचा क्षीण आवाज झालेल्या बारवांना बारमाही जिवंत पाणी दिसते. 

शहरीकरणाच्या रेट्यात बारवांचे अस्तित्व नष्ट करण्यात धन्यता मानली गेली. अखेरचा श्‍वास घेत असलेल्या बारवांचे बांधकाम ढासळले आहे. चिरेबंदी भिंती झाडे-झुडुपे फुटल्याने निखळत चालल्या आहेत.त्यातील पाणी वापरले जात नसून दुर्गंधीचे अन्‌ रोगराईचे स्रोत बनलेत. बारवांचे वैभव पुन्हा खुलवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा बनला आहे. त्याचवेळी पुरातत्व कायद्यानुसार बारवांच्या अस्तित्वाला धोका पोचवणाऱ्या आणि खासगी वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे शक्‍य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
... 

Web Title: marathi news water resource