पिण्याच्या पाण्याच्या रासायनिक तपासणीसाठी  साडेचार हजार नमुन्यांचे संकलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

नाशिक : जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी अभियान 1 मार्च ते 15 जूनपर्यंत राबविण्यात आले. यात जिल्ह्यातील सात हजार 393 जलस्रोतांपैकी चार हजार 569 स्त्रोतांचे नमुने संकलित केले. ते तपासणीसाठी जिल्ह्यातील सहा प्रयोगशाळांत पाठविण्यात आले आहेत. यंदा प्रथमच जिओ फेन्सिंग मोबाईल ऍपद्वारे शंभर टक्के स्रोतांमधील पाण्याचे नमुने घेण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिओ फेन्सिंगद्वारे पाणी नमुने गोळा करण्याचे काम 1 मार्च ते 15 जूनपर्यंत पूर्ण करावयाचे होते. त्याअनुषंगाने नाशिक जिल्ह्यात जिओ फेन्सिंग मोबाईल ऍपचा वापर करून एकूण सात हजार 393 स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत प्रथमच स्रोतांचे 100 टक्के टॅगिंग करण्यात आले. टॅगिंग केलेल्या स्रोतापैकी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या चार हजार 569 स्रोतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत देण्यात आले. उर्वरित दोन हजार 824 स्रोत विविध कारणांमुळे बंद, कायमस्वरूपी बंद, वापरात नसलेले, पाण्याअभावी कोरडे आढळले आहेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water sample