ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी भटकंती कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पळसन : चुली (ता.सुरगाणा) सह अन्य ग्रामीण भागात सार्वजनिक विहीरी कोरड्याठाक झाल्या आहेत. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकत फिरावे लागत आहे. 

सुरगाणा तालुक्‍यातील चुली, मोहपाडा, गोणदगड, खिरमानी, फनसपाडा, श्रीरामपुर, वाजुळपाडा, जामनेमाळ, शिवपाडा, झुडीपाडा, गावितपाडा, उंबरपाडा, सुकापुर, मोरडा, या गावांना सध्या भिषन पाणी टंचाई आहे. या गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महिन्यापासून पडून आहे. येथील नागरिकांच्या पाचवीलाच पाणी टंचाई पुजल्यागत त्यांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

 नागरिक सार्वजनिक विहीरीजवळ दिवसरात्र ठाण मांडून बसलेले असतात. चुली या गावांची लोकसंख्या 376पेक्षा जास्त असून गावात पाळीव प्राण्याची संख्या शंभरावर आहे. गावा शेजारील सार्वजनिक विहीरीने तळ गाठला आहे. जून महिन्या पाहीले तर पाऊस पडे पयॅत आकाशाकडे तकलाऊन वर्षानुवर्ष काळ या गावातील महिलांना दुपारी तिन पासून राञभर जागून पहाटे तिन पयॅत चाललेली पाणी मिळवण्यासाठी धडपड बघावयास मिळाली यांमध्ये सत्तरी ओलांडलेल्या महीलापासुन ते पाच वर्षाच्या मुलापयॅत सर्वांचा समावेश आहे.

जेथें पावसाळ्यात अडीच हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तेथिल हे चिञ पाहुन डोळ्यांवर विश्वास बसत नाही.सुरगाणा नार-पार पाण्याकरिता महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत संघर्ष चालु असताना चुली सारख्या व इतर गावांना पाण्यासाठी चाललेला संघर्ष त्याहुनही भयानक आहे. आमदार जे.पी.गावित. खासदार.हरिचद चव्हाण .जिल्हा परिषद सदस्य ज्योती जाधव. पंचायत समिती उपसभापती इंद्रजित गावित. यांचे नेतृत्व चुली गावाला आहे.या गावाला लवकरात लवकर टॅकरने पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी संगिता खुरकुटे. मिना वाघेरे. वनिता म्हसे. गंगा म्हसे. निरदा म्हसे. निर्मला म्हसे. रेखा म्हसे. शांताबाई म्हसे. केशव म्हसे. विलास खुरकुटे. राजू म्हसे. खंडु म्हसे. यांनी केली आहे. 

Web Title: marathi news water shortage