पूरबाधित गावांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा विजेअभावी पाणी बंदच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नाशिकः पावसाने सोमवारी (ता. 5) विश्रांती घेतली. पण गोदावरी-दारणेसह विविध नद्यांचा पूर कायम होता. दोन्ही प्रमुख नद्यांचा विसर्ग मोठा असल्याने दारणेच्या पुरात 70, तर गोदावरीच्या पुरात 30 हून अधिक गावांतील वीजपुरवठा गायब आहे. शंभराहून अधिक रोहित्र आणि काही वीज केंद्रे पुराच्या पाण्यात आहेत. त्यामुळे वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. परिणामी, अनेक गावांत आज टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. 

दारणा नदी ओसंडून वाहत आहे. सत्तरहून अधिक गावांतील संपर्क यापूर्वीच तुटला आहे. पण रोहित्र पुराच्या पाण्यात असल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. इगतपुरीसह नाशिक तालुक्‍यातील नाणेगाव, संसरी आणि थेट दारणा, सांगवीपर्यंतच्या गावांना दारणेच्या पुराचा फटका बसला आहे. इगतपुरी ते निफाडदरम्यान गावाची संख्या जास्त आहे. दारणेचा पूर मोठा आहे. त्यामुळे सर्वाधिक सुमारे 78 गावांतील वीज पुरविणारे रोहित्र पुराच्या पाण्याखाली गायब झाले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water shortage