जिल्ह्यात 73 गावात 36 टॅंकरने पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

जळगाव - उन्हाळ्याच्या सुरवातीलाच जिल्ह्यातील 889 गावे पाणी टंचाईच्या छायेत आहेत. सद्यःस्थितीत 73 गावांमध्ये 36 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. एप्रिल ते जून या काळात 271 गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात पावसाळा कमी झाल्याने पाणीटंचाईचे सावट यावर्षी अधिक जाणवणार आहे. काही गावांमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल 29 कोटी 50 लाखांचा आराखडा मंजूर केला आहे. 

विहिरी अधिग्रहीत 
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 107 गावांमध्ये 107 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. जामनेर तालुक्‍यात 27, अमळनेर 26 तर पारोळा तालुक्‍यात 12 विहिरी प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहे. काही गावांमध्ये तात्पुरत्या पाणी योजना सुरू करण्यात आल्या असून 18 गावांमध्ये विंधन विहिरी सुरू करण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यातील टॅंकरची स्थिती 
तालुका.... टंचाईग्रस्त गावे.... टॅंकर सुरू 
अमळनेर 37 14 
जामनेर 17 12 
पारोळा 16 07 
बोदवड 01 01 
भुसावळ 01 01 
पाचोरा 01 01 
एकूण 73 36 

Web Title: marathi news water tanker jalgaon