निमोणला विहीरीतून पाणी चोरण्याचा अजब प्रकार

भाऊसाहेब गोसावी
शुक्रवार, 19 जुलै 2019

  निमोण -   भिषण पाणी टंचाई ने शेतकऱ्यांवर पाणी विहीरीला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.निमोण परिसरात गेल्या वर्षी पाऊस च झाला नाही त्यामुळे वर्षभर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा पाण्याचे प्रश्न भिषण आहे.शेतकर्यांनी विकत पाणी आणून माणसांसह जनावरांनची तहान भागवली.आता मात्र विहिरीतून पाणी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

निमोण ता. चांदवड येथील शेतकरी योगेश शंकर रायते यांच्या विहिरीतून आठ ते दहा फूट पाणी चोरीला गेले होते.योगेश रायते यांनी त्यांच्या विहिरीत पाच हजार लिटर चे पाच टॅंकर पाणी विकत टाकले होते.हे पाणी त्यांना जनावरांसह कुटुंबाला महिनाभर पुरले असते.मात्र पाणी चोरीला गेल्यामुळे त्यांचेवर मोठं संकट उभे राहिले आहे.निमोण शिवारात त्यांचे आठ एकर क्षेत्र आहे.या शेतीत त्यांनी एक पन्नास फूट खोल व एक तिस फूट खोल अशा दोन विहिरी खोदल्या आहेत.एक अडिचशे फूट खोल बोअर वेल केले आहे.मात्र गेल्या वर्षी पाऊस झाला नाही आणि एकाही विहिरीला पाणी आले नाही.मागच्या वर्षी चा हंगाम पूर्ण वाया गेला.वर्षभर पाणी विकत घ्यावे लागले.आणि आता विकत आणलेले पाणीच चोरीला गेल्याने रायते कुटुंब पुरते हादरलं आहे.निमोण परिसरात भिषण पाणी टंचाई ने हे संकट ओढवले आहे.

** शेजारील वराडी शिवारात ही पाणी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.. पाणी चोरणारा ही शेतकरी च असु शकतो.त्याच्यावर ही वेळ पाणी टंचाई चा व आर्थिक परिस्थिती अत्यंत भयावह अशी झाल्यानेच आल्याची भावना आहे

** आम्ही जनावरांना व कुटुंबांसाठी विकत पाणी आणून विहिरीत साठवले होते.ते चोरी गेल्यामुळे आता आमचे वर मोठं संकट आले आहे.
  -- योगेश शंकर रायते, निमोण

**. आमच्या शेजारी पाणी चोरीला गेल्यामुळे आम्ही सर्व आजुबाजुचे शेतकरी हादरलो आहे.आता आमच्या वर विहिरीला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.
   कुंदन देवरे, निमोण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water thieft