नाशिक जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी  12 ऑक्‍टोंबरपासून स्वतंत्र संकेतस्थळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

नाशिक ः जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 12 ऑक्‍टोंबरपासून स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात येईल. स्वतंत्र संकेतस्थळासोबत जिल्हा प्रशासनाने आणि यात्रा डॉट कॉम या संस्थेशी करार केला आहे. 

नाशिक ः जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 12 ऑक्‍टोंबरपासून स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात येईल. स्वतंत्र संकेतस्थळासोबत जिल्हा प्रशासनाने आणि यात्रा डॉट कॉम या संस्थेशी करार केला आहे. 

मुंबईत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत झालेल्या करारावर जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी स्वाक्षरी केली. करारानंतर ही संस्था प्रशासनाच्या 
संकेतस्थळाशी तोडली जाणार आहे. करार पर्यटन क्षेत्राशी निगडीत एअर बी. एन. बी., झूम कार, ओला या संस्थांसोबत प्रशासन करार करणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत पर्यटनस्थळाची माहितीसाठी प्रशासन www.unravelnashik.com हे या संकेतस्थळावर जिल्ह्याची पर्यटनाची माहिती उपलब्ध करणार आहे. 
संकेतस्थळामुळे पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील सुविधांची एकत्र माहिती मिळणार आहे. पर्यटनस्थळे, निवासाची ठिकाणे, स्थानिक भोजन, स्थानिक उत्सव आदी 
विविध प्रकारची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्यातून रोजगाराला मदत होणार आहे. विशेष प्रकल्प आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी संकेतस्थळाचे सादरीकरण केले. 

Web Title: marathi news website for nashik