तरुणाईच्या सकारात्मकतेस "व्हाइट व्हेल'चे प्रोत्साहन 

तरुणाईच्या सकारात्मकतेस "व्हाइट व्हेल'चे प्रोत्साहन 

जळगाव : नकारात्मक उद्दिष्ट्ये देऊन किशोरवयीन मुलांसह तरुणाईच्या जिवावर उठलेल्या घातक "ब्ल्यू व्हेल' गेमला उत्तर आणि तरुणाईतील सकारात्मकतेला कृतिशील उपक्रमाची जोड देण्याच्या उद्देशाने जळगावातील तीन तरुणांनी "व्हाइट व्हेल' नावाचा गेम विकसित केला आहे. "ब्ल्यू व्हेल'प्रमाणेच यातही "टास्क' दिले जाणार असून ती विविध सकारात्मक उपक्रम, सेवाकार्याची असतील, त्यातून तरुणाईला या कार्याबाबत दिशा मिळू शकेल. लवकरच हा गेम "प्ले स्टोअर'वर उपलब्ध होणार आहे. 
एखादा गेम अशाप्रकारे तरुणाईकडून नकारात्मक बाबी करवून घेत असेल तर हीच तरुणाई आपल्या कुटुंबीयांसाठी चांगले कामही हमखास करेल, या विचारातून केसीई अभियांत्रिकीचा चेतन गिरनारे व देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील अमित भामेरे व हर्षा शर्मा हे तीन विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी "ब्ल्यू व्हेल'ला सकारात्मक कार्यास उद्युक्त करणाऱ्या "व्हाइट व्हेल'ने उत्तर देण्याचे ठरले. 

चार महिन्यांनंतर यश 
या तिघाही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन चांगल्या कार्यांची उद्दिष्ट्ये (positive tasks) संकलित केली. "व्हाइट व्हेल' गेमवर या विद्यार्थ्यांनी सलग तीन-चार महिने काम केले. सामाजिक कार्ये, उपक्रमांची माहिती घेतानाच तांत्रिक बाबींची पूर्तता केली व अखेरीस त्यांना हा गेम विकसित करण्यात यश आले. 

असा आहे गेम 
या गेम प्रकारात विद्यार्थ्यांनी विविध 120 सकारात्मक उद्दिष्ट्ये संकलित केली असून ती सर्व व्यक्तिगत, कुटुंब, मित्र परिवार आणि समाज अशा चार प्रकारात वर्गीकृत केली आहेत. प्रत्येक प्रकारात गेम्सच्या चार लेव्हल देण्यात आल्या. त्यासाठी गेममध्ये काही व्हीडीओही देण्यात आले आहेत. प्रत्येक लेव्हल पार केल्यानंतर गेम खेळणारा तरुण समाजासाठी चांगले काम करण्यास उद्युक्त होईल. 

सकारात्मक विचारांची प्रेरणा 
या गेमचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात एक मोठी व्हीडीओ लायब्ररी असून त्यात जीवनातील विविध टप्प्यांवर आपल्यासमोर संकटे आली तर त्याला सामोरे जाऊन त्यावर मात कशी करायची, याबाबत प्रेरणादायी सोल्यूशन मिळू शकेल. 

"प्ले स्टोअर'वर लवकरच 
गेम खेळणाऱ्या "युजर'च्या पालकांनाही त्यात सहभागी होता येईल. मुलाकडून काही चांगले काम करुन घ्यायचे असेल तर ते पालक या माध्यमातून करू शकतील. त्यासाठी गेममध्ये "as a parent login' असे करायचे आहे. हा गेम लवकरच म्हणजे 16 ऑक्‍टोबरनंतर "प्ले स्टोअर'वरून डाऊनलोड करता येईल. The Life Changing Game या नावाने तो असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com