महिला पोलिसाची रेल्वेखाली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पाचोरा - येथील मध्य रेल्वेच्या अप रेल्वे मार्गावर महिला पोलिस कर्मचाऱ्याने मुंबईकडे जाणाऱ्या गोवा एक्सप्रेस खाली झोकून देत आत्महत्या केली. विशेष म्हणजे अंगावर गणवेश असतांना आत्महत्या तिने केली आहे. पाचोरा रेल्वे औटपोस्टला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहिती अशी की, चाळीसगांव तालुक्यातील लोंढे येथील रहिवासी असलेल्या व सध्या भडगांव पोलिस स्टेशनला नियुक्तीस असलेल्या संगीता निकम (वय २३) या महिला पोलिस कर्मचाऱ्याने आज (ता. २६) सकाळी दहा वाजेच्या सुमारास धावत्या गोवा एक्सप्रेस खाली झोकून देत आत्महत्या केली. अंगावर गणवेश असल्याने ओळख पटण्यात अडचण आली नाही. रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. मृत संगीताचा विवाह दोन वर्षांपूर्वी विखरण (नंदूरबार) येथे झाला होता. तिचे पती दिपक निकम हे रेल्वे कर्मचारी असून परधाडे (ता. पाचोरा) रेल्वे स्थानकावर गेटमन म्हणून नियुक्तीस आहेत. दोघेजण भडगांव पोलिस वसाहतीत वास्तव्यास होते. आज सकाळी रेल्वे खांब क्रमांक ३७२/३ जवळ त्यांचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह आढळला. त्यानंतर ओळख पटविण्यात आली. पोलिस उपअधिक्षक केशव पातोंड, रेल्वे पोलिसच्या एपीआय राखुंडे यांनी भेट देऊन परिस्थिती हाताळली. आत्महत्येमागील नेमके कारण गुलदस्त्यात आहे. मृत संगीताच्या आई-वडिलांनी ग्रामीण रुग्णालयात केलेला आक्रोश पाहून सारेच हेलावले. 

Web Title: Marathi News Woman Police Suicide Railway