गाळेधारकांचा स्थगिती अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

जळगाव ः महापालिकेच्या कारवाई व कलम 81 "क' नोटिशीच्या विरोधात फुले मार्केटमधील पाच गाळेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने गाळेधारकांनाही "अल्टिमेटम' देत तीन दिवसांत 75 टक्के रक्कम भरण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी दोन गाळेधारकांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने गाळेधारकांना दणका देत अर्ज फेटाळून लावत दिलेल्या मुदतीत पैसे भरण्याचे आदेश दिले. त्यामुळे पैसे भरण्याची उद्या (ता. 26) अंतिम मुदत असून, पैसे न भरणाऱ्या गाळेधारकांवर दिवाळीनंतर कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे. 

महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 387 गाळेधारकांचे 2012 ला मुदत संपली होती. फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांना 81"क' ची नुकसान भरपाईची नोटीस बजावून 11 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली होती. 14 ऑक्‍टोबरला महापालिकेने तीन गाळे सील केले. मात्र, कारवाईच्या वेळी अधिकारी आणि गाळेधारकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर फुले मार्केटमधील पाच गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात महापालिकेच्या गाळे "सील'च्या कारवाईला (नोटीस कलम 81 "क') स्थगिती मिळावी, यासाठी धाव घेतली होती. यावर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 26 ऑक्‍टोबरपर्यंत 75 टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. या आदेशावर स्थगिती मिळावी, यासाठी दोन गाळेधारकांनी गुरुवारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने पुन्हा त्यांचा अर्ज फेटाळत दिलेल्या मुदतीत पैसे भरण्याचे आदेश दिले. 

आज शेवटचा दिवस 
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्या गाळेधारकांना तीन दिवसांच्या आत थकीत रकमेच्या 75 टक्के रक्कम 26 ऑक्‍टोबरपर्यंत भरण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे उद्या (ता. 26) शेवटचा दिवस असून, एका गाळेधारकाने गुरुवारीच 75 टक्के थकबाकी भरली असून, उद्या शेवटचा दिवस असल्याने चार गाळेधारकांना पैसे भरण्याची अंतिम मुदत आहे. 

दिवाळीनंतर कारवाईचा उडणार बार 
ज्या गाळेधारकांनी पैसे भरलेले नाही, त्यांच्यावर महापालिका प्रशासनाकडून दिवाळीनंतर गाळेजप्तीची कारवाई निश्‍चित केला जाणार आहे. जिल्हा न्यायालयाने देखील कारवाई का केली नसल्याचे फटकारले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून कारवाई निश्‍चित केली जाणार असून, त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news wyapari sankul gade dharak notice court