हिंगोणा येथे १२० शेतकरी झाले कर्जमुक्त 

farmer karjmukti
farmer karjmukti

हिंगोणा (ता. यावल)  :  राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली. या योजनेचा लाभ आजपासून मिळण्यास सुरुवात झाली असून, जिल्ह्यात हिंगोणा (ता. यावल) येथे या योजनेचा शुभारंभ झाला. येथील १२० शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरण अंमलबजावच्या अनुषंगाने हिंगोणे (ता. यावल) गावाची निवड झाली आहे. येथे विकासो संस्थेचे एकूण सभासद १३५४ असून, त्यापैकी ३३४ सभासद हे संस्थेचे कर्जदार सभासद आहेत. त्यापैकी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना अंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेवून, ३० सप्टेंबर २०१९ अखेर १३८ सभासद थकबाकिदार आहे. त्यांचे मुद्दल रुपये ७८.२३ लाख व व्याज १९.२८ लाख असे एकूण रुपये ९७.५१ लाख एवढ्या रकमेस पात्र आहेत. विकासो सोसायटीने १३८ शेतकऱ्यांची यादी कार्यान्वित केली. यापैकी १२० शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली असून, एकण ८२,७५, २७७ लाख एवढे कर्ज माफ झाले आहे. 


कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक निबंधक के. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य लिपिक एम. पी. भारंबे, तालुका लेखापरीक्षक पी. डी. पाटील, विनोद देशमुख, क्षेत्रीय अधिकारी पि. एन. राणे, ए. टी. तायडे, शाखा व्यवस्थापक सी. के. महाजन, विजयसिंह पाटील, सरपंच सत्यभामा भालेराव, शेतकरी छबु तडवी, महेंद्र पाटील, बाबू तडवी, नादर मन्यार, सुपडू तडवी, रवींद्र तायडे, नारायण चौधरी तसेच वि. का. चेअरमन सागर महाजन व कार्यकारी मंडळ उपस्थित होते. 

पाच हजारावर शेतकरी पात्र 
यावल तालुक्यात एकूण ८४ गावे असून, त्याअंतर्गत ४९ विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी एकूण ५, ४३३ सभासदांना मुद्दल रुपये २३८२.५१ लाख आणि ६०४.६७ लाख रुपये व्याज आहे. त्यापैकी २९८७.१८ लाख रुपये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्ज माफीस पात्र आहेत. सर्व सभासदांची माहिती पोर्टलवर अपलोड करून व तपासून जिल्हा बँकेला पाठविली होती. सर्व सभासदांची माहिती अपलोड झाली असल्याचे बँकेने सांगितले. 

कर्जमाफीमुळे आम्ही शेतकरी समाधानी आहे. परंतु शासनाने शेतकऱ्यांचे वीजबिल सुद्धा माफ करावे, तेव्हाच शेतकऱ्यांना खरी मदत होईल. 
- चेतना बेंडाळे, महिला शेतकरी (हिंगोणा). 

कर्जमाफीमुळे शेतकरी आनंदात आहे. परंतु सरसकट कर्जमाफी केल्यामुळे शेतकऱ्यावरील संपूर्ण कर्जाचा बोजा निघून जाईल. त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी. 
- नारायण चौधरी, शेतकरी (हिंगोणा). 

अशाच कर्जमाफी सारख्या विविध योजना राज्य शासनाने आपल्या महाराष्ट्रात राबवाव्या, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाही. 
- रवींद्र तायडे, शेतकरी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com