विधवा पुतनीला खोलीत डांबून अत्याचार

uncal atyachar
uncal atyachar

यावल : मनवेल (ता. यावल) येथील राहणाऱ्या नराधमाने स्वतःच्या पुतणीसोबत अनैतिक संबंध ठेवून तिला व तिच्या सात वर्षाच्या मुलीला डोंगरकठोरा या आपल्या बहिणीच्या घरात लपवून ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडिता व तिच्या मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. 


मनवेल येथील 28 वर्षीय तरुणीचे सातवर्षांपूर्वी फेकरी (ता. भुसावळ) येथील तरुणांशी विवाह झाला होता. काही वर्षानंतर तिच्या पतीचे आजाराने निधन झाल्यापासून ती आपल्या आई व मुलीसोबत मनवेल येथे राहात होती. ही विधवा तरुणी मागील दोन आठवड्यापासून सात वर्षाच्या लहान मुलीसह हरवल्याची नोंद यावल पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. 

पोलिस पाटलांनी दिली माहिती 
डोंगर कठोरा (ता. यावल) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात एक विधवा तरुण महिला आपल्या लहान मुलीसह एका महिलेकडे राहात असल्याची माहिती गावातील पोलिसपाटील राजरत्न आढाळे यांनी यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अखेर मनवेल येथील बेपत्ता झालेल्या त्या विधवा तरुणीला तिच्या सात वर्षाच्या मुलीसह शोधण्यास यश आले. 

काकाला घेतले ताब्यात 
दरम्यान पोलिस निरीक्षकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता. पीडितेचे काका संतोष यशवंत इंधाटे यांनी तिच्याशी अनैतिक संबंध ठेवून डोंगर कठोरा येथील बौद्ध वस्तीत लपवून ठेवले होते. अशी माहिती पीडित तरुणीने सांगितली. या गुन्ह्यातील संशयित संतोष इंधाटे याच्यावर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com