मुक्‍त विद्यापीठाच्या परीक्षा 25 मेपासून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले आहे. त्यानुसार आता मुक्‍त विद्यापीठाच्या परीक्षांना 25 मेपासून सुरवात होणार आहे. यापूर्वी 11 मेपासून परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र अपरीहार्य कारणास्तव परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड केले असून पदविका, पदव्युत्तर पदवी व प्रमाणपत्र अशा विविध 39 अभ्यासक्रमांचे सुधारीत वेळापत्रकाची अद्यापपर्यंत प्रतिक्षा आहे. 

जुन्या अभ्यासक्रमावर आधारीत तसेच नवीन सत्र पद्धतीवर आधारीत विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र अशा विविध अभ्यासक्रमांची परीक्षा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे नियोजित आहे. प्रारंभी या परीक्षांना 11 मेपासून सुरवात होणार असल्याचे जाहीर केले होते. तसे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. मात्र अंतीम परीक्षांच्या या वेळापत्रकात बदल केला असून, सुधारीत वेळापत्रकानुसार 25 मेपासून परीक्षांना सुरवात होणार आहे.

या बदलाची नोंद विद्यार्थी तसेच अभ्यास केंद्र व विभागीय केंद्रांनी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे केले आहे. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान बुधवारी (ता.25) विद्यापीठातर्फे काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात कला शाखेतील बी. ए., बी. कॉम. अभ्यासक्रमांचे 25 मेपासूनचे वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एम.एड. च्या परीक्षा 1 जूनपासून, एम.कॉम. नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा 1 जून तर जुन्या  अभ्यासक्रमाच्या एम. कॉम अभ्यासक्रमाची परीक्षा 4 जूनपासून सुरू होईल. 

मेच्या पहिल्या आठवड्यात वेळापत्रक होईल जाहीर 
नव्या सत्र पद्धतीतील एम. ए. मराठी, हिंदी, इंग्रजी, शिक्षणशास्त्र. बी.एड. (2009 पॅटर्न), बी एड. (2015 पॅटर्न) यासह विविध अभ्यासक्रमाच्या पदविका अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एमबीए, एम. एस्सी., बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ फाईन आर्ट यासह विविध 39 अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे समजते. 

यामुळे पुढे ढकलल्या परीक्षा 
अमरावतीसह अन्य पारंपारीक विद्यापीठाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. अशा परीस्थितीत मुक्‍त विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांमार्फत स्थानिक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली होती. मात्र पूर्वीच पारंपारीक विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्याने मुक्‍त विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी असे पत्र विद्यापीठास प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांची सुविधा पहाता परीक्षा पुणे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. 

Web Title: marathi news ycmou exam