येवला नगरपरिषदेच्या गाळे सील करण्याचे आदेश   

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नाशिक ः येवला नगरपरिषदेच्या व्यापारी संकूलातील गाळे लिलावात 9 वर्षापासूनच्या अनियमितता झाल्याचे चौकशीत पुढे आल्याने जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी संबधित गाळे सील करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले आहे. 

नाशिक ः येवला नगरपरिषदेच्या व्यापारी संकूलातील गाळे लिलावात 9 वर्षापासूनच्या अनियमितता झाल्याचे चौकशीत पुढे आल्याने जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी संबधित गाळे सील करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले आहे. 

येवला नगरपरिषदेचे माधवराव पाटील व्यापारी संकूल असून त्यातील गाळ्यांचे लिलाव करतांना स्थानीक सत्ताधाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार अशोक संकलेचा यांनी त्यानुसार नगरपरिषदेचे चौकशी करीत, त्यातील अनियमितता शोधून काढीत त्यानुसार जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठविला होता. चौकशीत अनियमितता झाल्याचे उघड झाल्याने जिल्हा यंत्रणेला नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे गाळे सील करण्याचे आदेश दिले आहे. उपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत, गाळे सील करण्याचे आदेश बजावले आहेत. 

येवला नगरपरिषदेचे माधवराव पाटील व्यापारी संकूल असून त्यातील गाळ्याचे लिलावाचे वाटप करतांना गैरव्यवहार झाल्याची स्थानीक अशोक संकलेचा यांची तक्रार होती. 
तब्बल तीन वर्षापासून त्यांचा याप्रकरणी पाठपुरावा सुरु होता. नगरपालिकेच्या चौकशीत गाळे लिलावात अनियमितता झाल्याचे लक्षात येउनही कारवाई होत नसल्याने श्री संकलेचा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देउन संबधित गैरप्रकारात कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार, जिल्हा यंत्रणेने नगरपरिषदेला कारवाईचे आदेश दिले आहे. त्यात, इमारत पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या या इमारतीतील कायदेशीर बाबी तपासून गाळे सील करुन अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले आहेत. 

गाळे लिलावात अनियमितता.... 
भाडेमूल्य निश्‍चित करुन न करताच 9 वर्ष भाडेआकारणी 
जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता न घेताच भाडेपट्टा मुदतवाढ 
लिलाव आदेशाचे उल्लंघन करुन पहिल्या मजल्याचे लिलाव 
भाड्याने गाळे दिलेल्यांकडून करारपत्र करुन घेतलेले नाही. 
मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त गाळ्यांचे वाटप केले. कम्लेशनही नाही 

Web Title: marathi news yeola nager parishad