कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्याला उलटया होईपर्यंत केली मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

येवला : विक्रीला आणलेल्या कांद्यात वांधा घालीत व्यापाऱ्याने एका शेतकऱ्याला चांगलाच चोप दिल्याने शेतकऱ्याला दवाखान्यात हलवण्याची वेळ आली असून या शेतकऱ्यावर उपचार सुरु आहे. हा प्रकार बाजार समितीच्या आवाराबाहेर व्यापाऱ्याच्या खळ्यावर घडला आहे. व्यापाऱ्याच्या या मुजोर वागण्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत असून संबधित व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

बुधवारी रात्री अनकुटे येथील वाल्मिक गायकवाड या शेतकऱ्याने येथील एका बड्या व्यापाऱ्याच्या खळ्यावर खरेदीसाठी आलेल्या मनमाड येथील व्यापाऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्यावरून वांधा घातला होता. कांद्याच्या प्रतिवरून व्यापाऱ्याने कांदा खाली करण्यास नकार दिला. यावेळी व्यापारी व शेतकऱ्यामध्ये झालेल्या चकमकीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चोप देत कानशिलात लगावलेल्या थप्पडीने शेतकऱ्याला दुखापत होत उलटया झाल्या व ते काही काळ व्यापाऱ्यांच्या खळ्यावर बेशुद्ध अवस्थेत पडून होते. काही वेळाने गायकवाड यांना खाजगी रुग्णालयात त्याच्या नातेवाईक मित्रानी दाखल केले.दोन दिवस बाजार समितीची सुट्टी असल्याने हा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. बाजार समिती प्रशासनाने हा व्यापारी आपल्याकडील नसल्याचे सांगितले आहे.बुधवारी सायंकाळी कार्यालय बंद झाल्यावर शेतकरी व व्यापारी यांच्यात हाणामारी झाली. तो व्यापारी बाजार समितीचा नसून हा वाद खल्यावर झाला असल्याने यात बाजार समितीचा कुठलाही रोल येत नाही,असे सचिव डी.सी. खैरनार
यांनी सांगितले.या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

“त्या व्यापार्याने माझे कांदे घेतल्यावर त्यात वांधा म्हणजे कुरापत काढली. मी वांधाबिंधा काही नसून माझे कांदे व्यवस्थित भरून द्या असे सांगितले. यावर थेट मारायलाच सुरुवात केली. व्यापाऱ्याने मारल्यावर मी रामेश्वरदादाच्या खळ्यात गेलो. तेथे मी पाऊण तास पडलो. मात्र एकाही व्यापाऱ्याने मला उचलले नाही. उलट्या प्रमाणाबाहेर झाल्या असून त्यामुळे कुणीच उचचले नाही. लहान भावाने व त्याचे जोडीदार होते त्यांनी येथे दवाखान्यात आणले, असे वाल्मिक गायकवाड यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news yeola news farmer business victim