शिवजयंतीनिमित्त शिवनेरी ते लखनऊ मोटरसायकल रॅली

motorcycle-rally
motorcycle-rally

येवला - उत्तर भारतात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी मोटरसायकलने शिवज्योत घेवुन निघालेली शिवनेरी ते लखनऊ रॅली शहरात आज दाखल झाली. या रॅलीचे पारंपारीक हलकडीच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले. आज बुधवारी दुपारी अडीच वाजता फत्तेबुरुज नाका येथे ही रॅली आली.

या यात्रेमध्ये जे तरुण सहभागी झाले होते त्यांना कुठलाही आर्थिक भार सहन करावा लागू नये म्हणून मोटारसायकलच्या इंधनापासून ते रॅली काळातील संपूर्ण खर्च उत्तर प्रदेशातील मराठी बांधवांनी उचलला. यात उत्तर प्रदेश मधील सुमारे दहा हजार परिवारानी सहभाग घेतला. 

या रॅली मार्गातील या प्रवासात जंगली महाराज आश्रम (कोपरगाव ), धुळे, इंदोर भोपाळ, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा, कानपुर येथे रॅलीत सहभागी तरुणांचे भव्य स्वागत करण्यात आले. रॅलीचे प्रमुख पांडुरंग राउत, शशिकांत कदम, दिपक पगार व रॅलीतील सहभागी युवकांचा माजी आमदार मारोतराव पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस ऍड. माणिकराव शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर यांनी सत्कार केला.

यावेळी नगरसेवक प्रविण बनकर, ऍड.शाहू शिंदे, अर्जून कोकाटे, भास्कर कोंढरे, सुभाष पाटोळे, एकनाथ गायकवाड, संजय सोमासे, सुदाम पडोळ, बाळासाहेब गांगुर्डे, योगेश्‍वर ठोंबरे, प्रविण निकम, दामोधर कोकरे, तुषार शिंदे, श्रीकांत खंदारे, सुंनील गायकवाड, देविदास जाधव, संजय पवार यांच्यासह शिवप्रेमी नागरिकांनी विंचूर चौफुली येथे मोठी गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ही रॅली शिवज्योत घेऊन लखनऊ येथे १ हजार ६५१ किलोमीटरचा प्रवास करुन पोहोचणार आहे. येथे शिव छत्रपतीचा भव्य अश्वारुढ पुतळा उभा करण्यात आला आहे. तेथे शिवजंयती साजरी करुन या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीतील सर्व सहभागी तरुणांसाठी एक स्वतंत्र आचारंसंहिता तयार करण्यात आली आहे, असे यावेळी राउत यांनी सांगितले.
 या रॅलीत दिपक पगार, संनील खेलुकर, पंकज पवार, वसंत विसपूते, बळीराम पाटील, रामदास पवार, देविदास आहेर, प्रतिभा आहेर यांच्यासह सुमारे २५० युवक सहभागी झालेले आहे. या रॅलीला ऍड. माणिकराव शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com