कला, डिझाईनमध्ये कल्पकतेला वाव  "यिन फेस्ट' मध्ये आदिती देव,मयुरी निकुंभ यांचा संवाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नाशिक : आपला अवगत कलेतून उत्पन्न म्हणून चार पैसे मिळतील, असा विचार करायला नको. आपल्या सभोवताली बऱ्याच कलात्मक गोष्टी असतात. त्या पाहण्याचा दृष्टीकोन तरूणाईने विकसीत करायला हवा. कला अन्‌ डिझाईन या क्षेत्रांमध्ये कल्पकतेला भरपूर वाव असून, या क्षेत्रात करीअर घडविण्यासाठी तरूणांनी मेहनतीची तयारी ठेवावी, असे मत सोमवारी (ता.27) झालेल्या 'यिन टॉक'मध्ये मान्यवरांनी व्यक्‍त केले. 

नाशिक : आपला अवगत कलेतून उत्पन्न म्हणून चार पैसे मिळतील, असा विचार करायला नको. आपल्या सभोवताली बऱ्याच कलात्मक गोष्टी असतात. त्या पाहण्याचा दृष्टीकोन तरूणाईने विकसीत करायला हवा. कला अन्‌ डिझाईन या क्षेत्रांमध्ये कल्पकतेला भरपूर वाव असून, या क्षेत्रात करीअर घडविण्यासाठी तरूणांनी मेहनतीची तयारी ठेवावी, असे मत सोमवारी (ता.27) झालेल्या 'यिन टॉक'मध्ये मान्यवरांनी व्यक्‍त केले. 

"सकाळ'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) च्या "यिन फेस्ट' कार्यक्रमाचे आयोजन गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ऍड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात केले होते. या कार्यक्रमात द डुडल फॅक्‍टरीच्या प्रमुख व सुलेखनकार अदिती देव तसेच "एलिफंट' या डिझाईन कन्सल्टन्सी असलेल्या कंपनीत व्हीज्युअल कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख मयूरी निकुंभ यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी गोदावरी सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा आर्किटेक्‍ट अमृता पवार, मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील, ऍड. ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. होळकर, "यिन'चे चीफ मॅनेजर तेजस गुजराथी, "सकाळ'चे युनीट व्यवस्थापक राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

चित्रकृती आपल्या सभोवताली असते, आपण ती बनवत नसतो तर रेखाटत असतो. तसेच डिझाईनदेखील आपण बनवत नाही, तर सभोवताली जे असते तेच टिपण्याचा प्रयत्न करतो. त्यामूळे कला, डिझाईनच्या बाबतीत आपल्या आजू-बाजूला घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसीत झाला पाहिजे, असे मान्यवरांनी मार्गदर्शनावेळी सांगितले. दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनीही प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसन करून घेतले. 
"यिन'चे चीफ मॅनेजर तेजस गुजराथी म्हणाले, की तरूणांच्या वैयक्‍तिक, व्यावसायिकता व सामाजिक विकासाकरीता "यिन'चे व्यासपीठ कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून "सकाळ'च्या संचालिका मृणाल पवार यांच्या संकल्पनेतून "यिन फेस्ट' राज्यभर आयोजित केला जातोय. यापुढील काळातही उपक्रमाच्या श्रृंखलेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. तर प्रसाद बेडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

 
तरूणांच्या मनात आर्ट, डिझाईनविषयी भरपुरशा संकल्पना असतात. या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असते. आजचा कार्यक्रम उपस्थित विद्यार्थ्यांना केवळ करीअरसाठीच नव्हे तर जीवनाला नवीन दृष्टीकोन देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. 
-आर्किटेक्‍ट अमृता पवार, 
अध्यक्षा, गोदावरी बॅंक. 

कला, सुलेखनातून जगणे सुंदर बनवा : अदिती देव 
आपल्या कलेसाठी कुणीतरी पैसे देईल, याची वाट बघायला नको. आपल्याला जी कला येते, त्यात आणखी नैपूण्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवायला हवे. काही तरी वाचून, नव्या व्यक्‍तींना भेटून, किंवा लिखान अशा विविध माध्यमातून आपल्या वैक्‍तिमत्वात रोज भर घालण्याचा प्रयत्न युवकांनी करावा. कला, सुलेखनातून (कॅलीग्राफी) जगणे सुंदर बनवा, असे आवाहन अदिती देव यांनी यावेळी केले. त्यांनी लहानपणी निर्माण झालेल्या चित्रकलेच्या आवडीपासून तर "द डुडल फॅक्‍ट्री'च्या उभारणीपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. 

त्या म्हणाल्या, की कुठल्याही कलेत सरावाने सुधारणा होत जातात. चित्रकलेचे वेगळे वैशिष्ट्य आहेत. गणितात गोळाबेरजेची खातरजमा होऊ शकते, संगीतात वेगवेगळ्या रागातून वर्गिकरण होते. परंतु चित्र हवे तसे रेखाटता येते, त्यात दुरूस्ती करण्याची संधी असते, असे त्यांनी नमुद केले. 
दैनंदिन जीवनातील विविध प्रसंग चित्रकृतीच्या माध्यमातून कायमस्वरूपी स्मरणात ठेवत असल्याचा रंजक फंडा त्यांनी उपस्थितांसमोर सादर केला. तसेच लॅटीन व देवनागरी शैलीतील कॅलीग्राफीतील फरक, अरबन स्केचिंग करतांनाचे बारकावे आदींबाबत उपयुक्‍त अशी माहिती त्यांनी दिली. 
 

Web Title: marathi news yin fest

फोटो गॅलरी