जळगावात यिन समर यूथ समिट'साठी युवा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

जळगाव ः महाविद्यालयीन युवकांना "सकाळ यूथ समिट'च्या माध्यमातून प्रेरित केले जावे, त्यांच्यात समाजाच्या सकारात्मक बदलांची जाणीव निर्माण करण्याच्या हेतूने "सकाळ माध्यम समूह' व "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यिन' व्यासपीठातर्फे "यिन समर यूथ समिट' जळगावात गुरुवारपासून (14 जून) सुरू होत आहे. 

जळगाव ः महाविद्यालयीन युवकांना "सकाळ यूथ समिट'च्या माध्यमातून प्रेरित केले जावे, त्यांच्यात समाजाच्या सकारात्मक बदलांची जाणीव निर्माण करण्याच्या हेतूने "सकाळ माध्यम समूह' व "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यिन' व्यासपीठातर्फे "यिन समर यूथ समिट' जळगावात गुरुवारपासून (14 जून) सुरू होत आहे. 
जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी आयोजित करण्यात आलेले हे "समिट' शहरातील लाडवंजारी समाज सभागृहात 14 ते 16 जूनदरम्यान होणार आहे. "समिट'मध्ये महाविद्यालयीन युवकांना करिअरच्या संधी, योग्य दिशा तसेच शिक्षण, उद्योग, नेतृत्वगुण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, करिअर निवड, उद्योजकांच्या संधी, नवीन तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या मान्यवरांसोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. 
याशिवाय, शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील संधींचा वेध घेतला जाणार आहे. राज्यभर होणाऱ्या "समिट'साठी स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी मुख्य प्रायोजक, तर पॉवर्ड बाय हॅशटॅग व जळगावातील रायसोनी ग्रुप हे असोसिएट प्रायोजक आहेत. केसीई सोसायटी, श्री गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी, धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी, एस. व्ही. के. एम., शिरपूर सहप्रायोजक आहेत. "समिट'मध्ये सहभागी होणाऱ्या "यिन'च्या सदस्यांना निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
नोंदणी केल्यास मिळणार..
वार्षिक स्मरणिका दैनंदिनी, ओळखपत्र, प्रमाणपत्र, गोयल गंगा ग्रुपतर्फे निनाद बेडेकर, शिवप्रसाद मंत्री व डॉ. सुनील डोके लिखित छत्रपती शिवाजी महाराज व पहिले बाजीराव पेशवे यांची "कालातीत व्यवस्थापन तत्त्व' हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येईल. संपर्क : अंकुश सोनवणे ("यिन' समन्वयक, खानदेश) ः 9689053211 

 
"सकाळ माध्यम समूहा'च्या "यिन'च्या माध्यमातून युवकांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारा उपक्रम आहे. तरुणांना अनेकदा योग्य मार्ग सापडत नाहीत; पण "यिन समर यूथ समिट'मधून युवकांना निश्‍चितच मार्गदर्शन मिळेल. आताच दहावी आणि बारावीचा निकाल लागला असून, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य वेळी घेतला गेलेला कार्यक्रम आहे. अशा "सकाळ-यिन'च्या ध्येयवादी उपक्रमास सदिच्छा! 
- सुरेश भोळे, आमदार, जळगाव शहर 

 
"सकाळ'ने युवकांसाठी राबविलेल्या "समर यूथ समिट'च्या उपक्रमात खानदेशातील विकास व्हावा, यानुसार कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली आहे. निश्‍चितच एक चांगला उपक्रम असून, जाणीव- जागृती होण्याच्या दृष्टीने प्रत्येक मार्गदर्शन देणाऱ्या या कार्यक्रमातून युवकांना समाजकारण आणि राजकारणात काम करण्यासाठी उपयुक्‍त ठरणारा असेल. 
- शिरीष चौधरी, माजी आमदार, रावेर 

Web Title: marathi news yin summer samit