शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी शुक्रवारी योगेंद्र यादव नाशिकमध्ये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

 नाशिकः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दुःख जाणुन घेण्यासाठी शुक्रवारी (ता.21) अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समीतीचे प्रणेते व स्वराज इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव पिंपळगाव बसवंत येथे येणार आहे. 

 नाशिकः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दुःख जाणुन घेण्यासाठी शुक्रवारी (ता.21) अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समीतीचे प्रणेते व स्वराज इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव पिंपळगाव बसवंत येथे येणार आहे. 

गेल्या दोन वर्षत देशातील 207संघटनांच्या माध्यमातुन श्री. यादव यांनी शेती भावाचे प्रश्‍न धसास लावण्याचा प्रयत्न केला आहे. आतही ते शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळाला पाहीजे. हे आंदोल ज्या पिंपळगाव बसंत येथुन सुरु झाले त्या गावातुच पुन्हा नव्याने शेतकरी संघटन सुरु करणार आहेत. गुंतवणुक, श्रमाची किंमत व नफा यावर शेतमालाचे भाव ठरावे. अशी समीतीची मागणी आहे. याबाबत कांदा उत्पादक शेतकरी व कष्टकरी यांच्यांशी संवाद साधण्यासाठी श्री यादव शुक्रवारी सकाळी साडे नऊला पिंपळगाव बाजार समीतीत येणार आहेत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात स्वराज इंडीयाचे प्रदेशाध्यक्ष ललित बाबर ऍड. सवीता शिंदे,सुभाष लोमट, अण्णासाहेब खंदारे, मानव कांबळे, ओमप्रकाश कलमे, ऍड. शकील खान, अलोक कांबळे, मार्गदर्शन करणार आहेत. असे युवा नेते अमोल गोरडे, मनोहर कदम, मनोहर बांगर, राकेश होळकर, संजीव साने यांनी कळवीले आहे. 

Web Title: marathi news yogendra yadhav