सरकारने ३७० रद्द करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केले-योगी आदित्यनाथ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती, मात्र कॉंग्रेस सरकाने बाबासाहेबांच्या भुमिकेकडे दुर्लक्ष केले होते. भाजप सरकारने कलम 370 रद्द करून देश एकसंघ तर केलांचं शिवाय बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण केल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. 

पवन नगर येथील मैदानावर भाजप-शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ बोलतं होते. ते म्हणाले, कलम 370 हे कॉंग्रेसचं पाप पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी देश एकतेसाठी कठोर निर्णय घेत दहशतवादाला पायबंद घातला. तीन तलाक कायदा रद्द करून मुस्लिम महिरांना मुख्य प्रवाहात आणले. धमकीखोर पाकिस्तान अणुबॉम्बच्या धमक्‍या द्यायचा परंतू जशास तसे उत्तर मिळाल्यानंतर चुपचाप बसला.

काश्‍मिर मध्ये लागु करण्यात आलेल्या कलम 370 ला बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. मात्र कॉंग्रेसने विरोधाकडे दुर्लक्ष केले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केल्या पंधरा वर्षात फक्त स्वताचा विकास पाहिला. परिवार वाद, जातीयवादी राजकारण दोन्हिी कॉंग्रेसने दिले. कॉग्रेस ची स्थिती सध्या नेता, निती व नियत नसलेला अशी झाली आहे. राहुल गांधी जेथे प्रचाराला जातात तेथे कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागते. महाराष्ट्रात त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याने आता विजय निश्‍चित झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी वीज, गॅस, घर या योजनांच्या माध्यमातून विकास दाखविला.

    राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी त्या योजना सक्षमपणे राबवून विकासाच्या मार्गावर राज्याला नेले आहे. देशाच्या प्रगती मध्ये महाराष्ट्राचे कायम योगदान राहिले आहे. राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेवर येईल. आजही योग्य विचार मांडणाऱ्या प्रतिनिधींची गरज असल्यानं युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य रघुनाथ कुलकर्णी, खासदार जगदंबिका पाल, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे, मध्यच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते आदी यावेळी उपस्थित होते. पुर्व मतदारसंघाच्या उमेदवार सिमा हिरे यांनी प्रास्ताविकात सिडको, सातपूर भागात केलेल्या कामांचा आलेख मांडला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yogi adhitnath