सोनांबेला कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतकऱ्यांची आत्महत्या

विजय बोऱ्हाडे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सोनांबेः कर्जाला कंटाळून अविवाहित तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. रविंद्र बाळासाहेब बोडके(वय२३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अवघ्या सहा महिन्यापूर्वी सोळा जानेवारीला विहीरीचे खोदकाम सुरु असतांना जिलेटीनच्या स्फोटात मयत रविंद्रचे वडील बाळासाहेब बोडके यांचे निधन झाले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साजन नावाने तो सोनांबे पंचक्रोशीत प्रसिध्द होता. मनमिळावू आणि बोलके व्यक्तीमत्व म्हणून खूप मोठ्या मित्रपरिवाराचा चाहता होता. रविंद्र बोडके यांच्या वडीलाचे निधन झाल्यानंतर रविंद्रवर संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी होती.

सोनांबेः कर्जाला कंटाळून अविवाहित तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. रविंद्र बाळासाहेब बोडके(वय२३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अवघ्या सहा महिन्यापूर्वी सोळा जानेवारीला विहीरीचे खोदकाम सुरु असतांना जिलेटीनच्या स्फोटात मयत रविंद्रचे वडील बाळासाहेब बोडके यांचे निधन झाले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साजन नावाने तो सोनांबे पंचक्रोशीत प्रसिध्द होता. मनमिळावू आणि बोलके व्यक्तीमत्व म्हणून खूप मोठ्या मित्रपरिवाराचा चाहता होता. रविंद्र बोडके यांच्या वडीलाचे निधन झाल्यानंतर रविंद्रवर संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी होती. त्यांच्यावर पतसंस्थेचे पाच लाख रूपयांचे कर्ज होते तर अनेकांकडून हात उसणे असे सात लाखांच्या वर पैसे घेतले होते. या कर्जाला कंटाळून त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या मागे आई,दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सकाळी अकराला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news youth sucide