`सीईओ`च्या भेटीने विद्यार्थी,शिक्षकांच्या चेहऱ्यांवर फुलला आनंद...

residentional photo
residentional photo

खामखेडा- हिवाळी (ता त्र्यंबकेश्वर) येथील ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेला दिपावळी पाडव्याच्या दिवशी  भेट देत मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी व शिक्षणाधिकारी वैशाली झंनकर  यांनी शाळेतील विविध उपक्रम जाणून घेत प्रयोगशील शाळेच्या शिक्षक,पालक व ग्रामस्थांना शाळेसाठी सर्वोतोपरी मदत  करत आश्वासन देत विध्यार्थ्यांना दिपावळी निमित्त खाऊ वाटत शुभेच्या दिल्यात. 

         हिवाळी ता त्रंबकेश्वर येथील जिल्हा परिषदेची शाळा ३६५ दिवस चालते.तीन वर्ष्यापासूनच्या  मुलांना  १२ तास शाळेत केशव गावित व सहकारी शिक्षक अध्यापनाचे काम करतात.ह्या शाळेला जिल्हा भरातून शिक्षक भेटी देत उपक्रम जाणून घेतात.म्हणून ह्या विध्यार्थ्यांना भेट देण्यासाठी नुकतेच जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकरी अधिकारी एस भुवनेश्वरीव ,प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झंनकर यांनी भेट देत शाळेचे उपक्रम जाणून घेतले. 

                   ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.यावेळी शाळेचे विविध उपक्रम जाणून घेतले.शाळेच्या आवारात  असलेले 'हँगिंग गार्डन' त्यामध्ये लावलेली छोटी छोटी रोपं शाळेत लावलेले तरंगचित्रे,रंगविलेल्या आकर्षक भिंती,शैक्षणिक साहित्याचा महापूर या सर्व गोष्टींची ओळख करून घेतली. शाळेचा वर्गखोल्यामध्ये तयार केलेलं राज्यमार्ग,राष्ट्रीय महामार्गावरून विद्यार्थी महामार्गाचे नाव राज्य व राजधान्या यांची माहिती  विद्यार्थिनि   सांगितले.

                        बालवाडीच्या एका विद्यार्थिनीने २७ चा पाढा इयत्ता पहिलीच्या मुलांनी ५४ चा पाढा असे १८७, २००, २८३ इत्यादी पाढे विद्यार्थ्यांनी म्हणून दाखवले.सामान्यज्ञानावर आधारित राज्यघटनेतील कलमांची २५७ पर्यंत कलमे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याने बोलून दाखवली.अवघ्या साडेतीन वर्षाच्या बापू बरोबर  भुनेश्वरी मॅडम बालपणातच नेऊन ठेवले."बापुनाना बापूनानाच्या" गाण्याचा  भुवनेश्वरी मॅडमनेसुद्धा मुलांमध्ये बसून साथ देऊन कृतीयुक्त गान्यावर ठेका  धरला. 

          मी तुम्हाला जिल्ह्याचा एसपीचे,सीईओचे ऑफिस दाखवायला नेईन हे  मुलांना  भुवनेश्वरी मॅडमने सांगितले.डॉ वैशाली वीर यांनी  भुवनेश्वरी व वैशाली नावाचे स्पेलिंग लिहायला लावले. इयत्ता पहिलीच्या अमित  भोये या विद्यार्थ्यांनी अचूक रित्या  लिहून दाखवले.मार्क क्यूब देखील काही मिनिटात विद्यार्थ्यांनी सोडून दाखवले.अगदी दुर्गम भागात दोन वेळचे जेवण मिळणे अवघड तेथेही मुले अगदी बिनधास्त आत्मविश्वासू ज्ञानपिपासू वृत्तीने कार्यमग्न  पहात मडम यांनी  समाधान व्यक्त केले. 

           शाळेतील मुलं पेंटर,फिटर,टीचर,प्लंबर,इलेक्ट्रिशियन,कारपेंटर इ.कामे मुलं स्वतः करतात याचे कौतुक उपस्थितांनी केले.त्यानंतर  पाहुण्यांसमोर लोकनृत्याचा आविष्कार सादर करण्यात आला.मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी,शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर ,त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी मुरकुटे,गटशिक्षणाधिकारी  शिरसाठ,शिक्षण विस्ताराधिकारी बोडके,विषय सहाय्यक उर्मिला उशीर,गिव्ह  संस्थेचे प्रमुख  रमेश सर,गावातील पालक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदश्य विद्यार्थी उपस्थित होते.  

 हिवाळीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्भयता,हुशारी,सर्वगुणसंपन्नता,चिकाटी अनुभवली.अशा शाळा निर्मितीसाठी पुढील काळात प्रयत्न करणार आहोत. 

एस भुवनेश्वरी मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com