राष्ट्रवादीच्या गोवर्धन गटावर शिवसेनेचा भगवा,  पोटनिवडणूकीत चारोस्करांची बाजी, भाजप चौथ्या स्थानी

live
live

नाशिक ः जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटाच्या पोट-निवडणूकीत आज शिवसेनेचे राजेंद्र चारोस्कर 235मतांनी झाले. त्यांना 4290 मतांनी विजयी झाले. आमदार हिरामण खोसकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 12) मतदान झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने हा गट राष्ट्रवादी कडून ताब्यात घेतला. 
नाशिकला आज सकाळी तहसिलदार अनिलकुमार दौडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा टेबलावर मतमोजणी झाली. अखेरपर्यत चुरशीच्या झालेल्या या लढतीत प्रत्येक फेरीगणिक चित्र बदलत गेले. दुपारी साडे बाराला निकालाचे चित्र स्पष्ट झाले. अखेरपर्यत अतिशय उत्कंठावर्धक 
स्थितीत लागलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी जल्लोष केला. बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे, माजी मंत्री बबनराव घोलप, अजिंक्‍य चुंबळे आदीसह अनेक कार्यकर्ते मिरवणूकीने कार्यालयाबाहेर पडले. 

प्रत्येक फेरी चूरशीची... 

पहिल्या फेरीत प्रभाकर गुंबाडे व अपक्ष बारकू डहाळे यांच्यात चूरस होती. त्यात, 235 मतांनी गुंबाडे आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत डहाळे 1532 मत घेत, गुंबाडे यांच्यावर 466 मताची आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीत पून्हा गुंबाडे यांनी 1177 मत घेत डहाळे यांच्यावर आघाडी घेतली. चौथ्या फेरीपर्यत ही लढत गुंबाडे विरुध्द डहाळे अशीच सुरु होती. मात्र पाचव्या आणि सहाव्या फेरीत मात्र चित्र पून्हा पालटले, शिवसेनेचे राजेंद्र चारोस्कर यांनी 1267 आणि 1527 अशी मत घेत, आघाडीवरील दोन्ही उमेदवारांना मागे टाकत, 235 मतांनी निसटता विजय खेचून आणला. या तिरंगी लढतीत भाजपचे दौलत ससाणे हे मात्र एकाही फेरीत आघाडीवर नव्हते. सर्वात कमी ससाने यांनाच पडली. 

चुंबळे काका-पुतण्याचा संघर्ष
गोवर्धन गटातील पोट निवडणूकीत रिंगणात राष्ट्रवादी कॉग्रेस विरुध्द शिवसेना अशी असली तरी पडद्यामागे मात्र ही लढत बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे व त्यांचे पुतने रत्नाकर चुंबळे यांच्यातील राजकिय वर्चस्वाची लढाई होती. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांमागे रत्नाकर चुंबळे यांनी ताकद उभी केली होती. तर शिवसेनेच्या उमेदवारामागे शिवाजी चुंबळे सक्रिय सहभागी होते. त्यामुळे चुंबळे कुुटुंबातील या संर्घषात तुषार डहाळे या अपक्ष उमेदवारी महत्वाची ठरली. राष्ट्रवादी कॉग्रेसचा मोठा गट डहाळे यांच्यासाठी सक्रिय होता. त्याच जोरावर अपक्ष डहाळे यांनी, 3335 मत घेत, शिवसेनेचा विजय सोपा केला. दरम्यान गोवर्धन गटात यापूर्वीही बाबूराव रुपवते हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. मात्र मध्यंतरी आम्ही पराभव ओढवून घेतला होता. यावेळी तो पून्हा आम्ही तो मिळविला. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बबनराव घोलप यांनी व्यक्त केली. 


उमेदवार राजकिय पक्ष मिळालेली मते 
राजेंद्र अशोक चारस्कर (शिवसेना ) 4290 
प्रभाकर शंकर गुंबाडे (राष्ट्रवादी कॉग्रेस) 4053 
बारकू परसराम डहाळे (अपक्ष ) 3335 
दौलत भिमा ससाणे (भाजप ) 1617 
नोटा 127 
एकुण 13422
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com