जिल्हा परिषद कर्मचारी वेतनत्रुटीसंबंधी  मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक- पंकजा मुंडे 

live
live

नाशिकः जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी आणि बक्षी समितीचा खंड-2 चा अहवाल येत्या दहा दिवसांमध्ये प्रकाशित करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्याचा शब्द गुरुवारी (ता. 22) ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. संगणक व घरबांधणी कर्ज मंजूर करणे यासह इतर मागण्यांबाबत आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी उपसचिवांना दिल्या. 
 

सह्याद्री अतिथिगृहावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बलराज मगर, लेखा संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह सूर्यवंशी, आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण खरमाटे, सुदाम पांगुळ, विजयकुमार हळदे यांच्यासमवेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत झालेल्या बैठकीत ग्रामविकासमंत्री मुंडे बोलत होत्या.

सांगलीच्या पूरग्रस्तांच्या मदतकार्यावेळी हृदयविकाराने निधन झालेल्या पशुधन पर्यवेक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लिपिक, लेखा, परिचर, वाहनचालक, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी सुधारणे, सातव्या वेतन आयोगात पदनाम बदल सुधारणा, परिचरांना गणवेश व धुलाईभत्ता वाढवून मिळणे, गटविमा वर्गणी सुधारित आदेश देणे, मागासवर्गीय पदांवरील पदोन्नती बंदी उठविणे, सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरणे, अशा 15 मागण्यांबाबत बैठकीत चर्चा झाली. चर्चेत प्रकाश थेटे, अजय कस्तुरे, राजेंद्र बैरागी, श्रीकांत अहिरे, रामचंद्र मडके, राजन जगे, ए. पी. राठोड, यशवंत मनुस्मारे यांनीही भाग घेतला. 

बैठकीत चर्चेतील विषय 
- जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे 
- गुणवंत कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देणे 
- सुधारित आकृतिबंधात प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिक व लेखाची पदे वाढविणे 
- संगणक वसुली थांबवून परीक्षेसाठी मुदतवाढ देणे 
- अनुकंपा तत्त्वावरील जागांचे प्रमाण वाढविणे 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com