शिक्षण व्यवस्थेच्या पुर्नरचनेची गरज डॉ.माशेलकर

residenational photo
residenational photo


नाशिक : पूर्वी पुस्तकांतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी ग्रंथालयांमध्ये जावे लागत होते. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पन्नास ग्रंथालयांची क्षमता स्मार्टफोनमध्ये आली आहे. बदलांचा विचार करता शिक्षण व्यवस्थेची पुर्नरचना करण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले. 

गोखले एज्युकेशन सोसायटी शतकपूर्ती महोत्सवाचा समारोप कॉलेजरोडवरील संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अरुण निगवेकर, योगाचार्य विद्यापीठाचे स्वामी जनार्दनानंद, कीर्तनकार चारूदत्त आफळे, संस्थेचे अध्यक्ष एस. बी. पंडित, सचिव डॉ.मो.स. गोसावी, उपाध्यक्ष आर. जे. गुजराथी, मानव संसाधन संचालिका डॉ.दीप्ती देशपांडे, सहखजिनदार प्रा.बी.देवराज, बंगळूरू येथील इंद्रायनी सावकार, प्रभाकर सावकार, समीर कामत, डी.डी. शहाणे आदी उपस्थित होते. 

डॉ.माशेलकर यांनी विद्यार्थ्यांना पंचसूत्री सांगितली. धेय्य मोठे ठेवा. संधीची वाट बघण्यापेक्षा संधी निर्माण करा. अपयश हा एक भाग समजून उमेद न हारता धेय्याकडे वाटचाल सुरू ठेवा. यशाला मर्यादा नसल्याने यशाची शिखरे गाठत राहा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 

डॉ.निगवेकर म्हणाले, की चीनप्रमाणे भारतातही महाविद्यालयांचे काम तीन पाळीत व्हावे. याद्वारे उभारलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग काही तासांपूरता मर्यादित राहणार नाही. कार्यक्रमात उपस्थितांच्या हस्ते शतंजली या स्मरणीकेसह झेनिथ, गॅलंट, स्वयंप्रकाश, निबोधी, रिझोनन्स, स्पेक्‍ट्रम, अवबोध, सुसंवाद या स्मरणिका, नियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले. 

स्थित्यंतरांना सामोरे जाणारी हवी व्यवस्था
तंत्रज्ञान प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला असून तीव्र गतीने समाजात बदल घडता आहेत. झपाट्याने बदलणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे समाजात स्थित्यंतरे घडत असून, स्थित्यंतरे स्वीकरण्याइतकी सक्षम व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांनी स्वीकारावी, असे आवाहन डॉ.अनिल काकोडकर यांनी केले. ते म्हणले, की शहरीकरण वेगाने होत असले तरी आजही सुमारे 68 टक्‍के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. पुढील पंचवीस वर्षांपर्यंत मोठी लोकसंख्या ग्रामीण भागातीलच असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com