देव देव्हा-यात नाही.... तळेगावला शेतातील अनोखे मंदीर.!.

residentional photo
residentional photo

.
               नाशिक: जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही हे छोटे गाव.....गावातील नामदेव वाकचौरे यांच्या शेतात तीनशे वर्षा पूर्वीचे एक मंदिर लक्ष वेधून घेते.  गावात सतीचे मंदिर म्हणून परिचित असलेल्या या मंदिराचा इतिहास मात्र हरविला आहे. या मंदिरात मूर्तीच नसल्याने नेमके हे कोणते मंदिर होते. हे आज पर्यंत  समजलेले नाही. 
     

हे मंदिर अस्सल दगडात चुण्या मध्ये बांधलेले आहे शेतातील पंचवीस बाय पंचवीस च्या जागेत हे मंदिर उभे आहे प्रवेशद्वारा बाहेरील ध्यानस्थ अवस्थेतील  दोन मुर्त्या बघून ते जैन मंदिर असावे असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे तर गावातील ग्रामस्थ ते सती मंदिर असल्याचे सांगतात हे मंदिर दुर्गम भागात असल्याने त्याच्या कडे कुणाचे लक्षच गेले नसल्याने आज त्याची अवस्था बिकट आहे

मंदिरात प्रवेश केल्यावर समोरील मुगल शैलीतील जाळीचे कोरीवकाम दिसते आग्र्याच्या ताजमहालच्या नक्षीकामाची तुलना याच्याशी करता येईल एकात एक गुंफण हे या कलेचे वैशिस्त म्हणावे लागेल हे मंदिर बांधावरचे नाही त्यामुळे म्हसोबा, वेताळ आदींचे मंदिर ते नाही गावाच्या वेस जवळ नसल्याने ग्रामदेवता देखील असू शकत नाही  मग हे मंदिर कोणते असेल असा प्रश्न अभ्यासकांना पडला आहे 

      पूर्वी चांदवड तालुका खानदेश मध्ये येत असल्याने त्यावेळी फारुकी घरानाचे राज्य होते त्यामुळे येथे शूरवीराची समाधी किंवा कबर देखील असण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही या मंदिराचा अभ्यास होणे आवश्यक असून यामुळे प्राचीन इतिहास समोर येण्याची शक्यता आहे मंदिराला कळस नसल्याने ते पडले कि अगोदर पासून नव्हते  याची देखील उकल होण्यास मदत होईल हे मंदिर दगड आणि चुन्यात बांधले गेले आहे आतील नक्षीकाम अजून चांगल्या स्थिती आहेत.

     मंदीराची बाहेरील बाजू पडायला आली आहे मंदिरा बाहेरील मुर्त्या पहारेकरी च्या आहेत कि जैनांच्या आहेत याचा अभ्यास देखील होणार आहे नाशिक जिल्ह्यात अनेक मंदिरे अशी आहेत कि त्याची माहिती संकलित झालेली नाही धारणगाव मधील कृष्ण मंदिर असेच आहे निफाड,लासलगाव,चांदवड,येवला आदी परिसरात अनेक दुर्मिळ होत चालेले मंदिर बघावयास मिळतात त्यांचे डॉक्युमेंटशन झालेले नाही पुरातन खात्यामध्ये याच्या नोंदी देखील आढळत नाही यासाठी नाशिक मध्ये या मंदिरांच्या संवर्धनासाठी  प्रयत्न होणे आवश्यक आहे

आमच्या शेतात हे मंदिर सती मंदिर म्हणून ओळखले जाते या मंदिराचा इतिहास गावात कुणालाही माहित नाही मंदिरा खाली धन असल्याची अफवा ऐकायला मिळते शेताच्या बाजूला बांधावरील दैवत आहेत पण इतके मोठे  मंदिर  कुणाच्या शेतात दिसत नाही मंदिर पडायला लागले आहे. 
- नामदेव वाकचौरे , शेती मालक
 

मी या भागात भटकंती करीत असतांना मला हे मंदिर आढळून आले मंदिराची पाहणी केल्यावर हे जैन मंदिर असावे असे वाटले पण आतील रचना बघितल्यावर नेमके मंदिर कोणते असेल हे सांगता येत नाही या मंदिराचा अभ्यास होणे आवश्यक आहे  
 - संजय बिरार, लासलगाव मधील मंदिरांचे अभ्यासक

 मंदिराच्या वर्णना नुसार येथे समाधी  देखील असू शकते कारण तीनशे वर्षा पूर्वी चांदवड परिसरात फारुकिंचे राज्य होते त्यांच्या प्रमुख व्यक्तींची समाधी किंवा कबर असू शकते बाहेरील भागात आराधना करणाऱ्या मुर्त्या आणि आतील भागात मोगल शैलीची अदाकारी हिंदू मुस्लीम ऐक्य दर्शविणारी आहे 
 नईम पठाण , इतिहास अभ्यासक , निफाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com