नाशिक इनोव्हेशन फेस्ट 2018' च्या सहभागाविषयी उत्साह 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

नाशिक : सामाजिक प्रश्‍न कुठलाही असो, तो सोडविण्याचा सकारात्मक दृष्टीकोन बाळगतांना,यासाठी भन्नाट संकल्पना शोधणाऱ्या संशोधकांना आपले संशोधन मांडण्यासाठी हक्‍काचे व्यासपीठ "सकाळ'तर्फे उपलब्ध होणार आहे. "सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित "नाशिक इनोव्हेशन फेस्ट 2018' ही स्पर्धा तीन गटात होणार असून शालेय विद्यार्थ्यांसह पारंपारीक, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या महाविद्यायीन विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे.

स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 12 मार्चपर्यंत आहे. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्‍नांबद्दलची ओरड करणारे असंख्य असतात, पण त्या सामाजिक प्रश्‍नाचे सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे थोडेच असतात. अशा प्रयत्नशील व्यक्‍तींकडून समस्यांच्या सोडवणूकीसाठीच्या प्रयत्नातून होणारे संशोधन एकंदरीत समाजाच्या विकासासाठी उपयोगी ठरू शकतात. या संशोधनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने "सकाळ'च्या नाशिक आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त "नाशिक इनोव्हेशन फेस्ट 2018'चे आयोजन केले आहे.

या स्पर्धेतून समाजातील प्रत्येक घटकाला आपले संशोधन किंवा संकल्पना मांडण्याची संधी उपलब्ध असणार आहे. "फेस्ट'चे आयोजन 15 व 16 मार्च 2018 ला गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ऍड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असून, यात सहभागी प्रकल्प पाहण्याची संधी नाशिककरांना असणार आहे. तर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव 17 मार्चला होणाऱ्या "सकाळ'च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केला जाणार आहे. 

या गटात होईल स्पर्धा- 
तीन प्रमुख गटांत "नाशिक इनोव्हेशन फेस्ट 2018' ही स्पर्धा होणार आहे. यात अभियांत्रिकीशी निगडीत प्रकल्प, संकल्पनांच्या सादरीकरणासाठी एक गट असेल. तर वैद्यकीय, कृषी यासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प, संकल्पना सादरीकरणासाठीचा दुसरा गट स्पर्धेत आहे. तर शाळकरी विद्यार्थ्यांपासून तर शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक यांना त्यांचे प्रकल्प, संकल्पना सादरीकरणासाठी खुला गटदेखील या स्पर्धेत ठेवण्यात आला आहे. 

सहभागासाठी येथे साधा संपर्क- 
विद्यार्थ्यांना आपल्या शाळा, महाविद्यालयामार्फत सहभागासाठीचे अर्ज "सकाळ'कडे पाठवता येतील. "सकाळ'च्या सातपुर या मुख्य कार्यालयात "प्लॉट क्रमांक 32, एमआयडीसी, सातपुर, नाशिक-7' किंवा "एफबी/1-16, पहिला मजला, ठक्‍कर बाझार, नवीन सीबीएस, नाशिक.' या शहर कार्यालयाच्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा टपालामार्फत पाठविता येतील. अर्जासोबत प्रकल्प, संकल्पनेचा सविस्तर तपशील नोंदविणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी "सकाळ'चे शहर कार्यालय (0253) 2313353 किंवा सातपूर कार्यालय (0253) 2350066 या क्रमांकावर अथवा शरद धात्रक 9890011120 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 
 
Web Title: marathi sakal innovation feast