भाजपला धुळ्यात घरचा आहेर

भाजपला धुळ्यात घरचा आहेर
dhule corporation
dhule corporationdhule corporation

धुळे : महापालिकेत भाजपची (bjp) एकहाती सत्ता आहे. निवडणूक काळात या पक्षाने जनतेला विकासकामांबाबत आश्वासने दिली. ती पूर्णपणे फोल ठरली आहेत. त्यामुळेच महासभा किंवा स्थायी समितीच्या सभेत स्वकीयच टीकाटिप्पणी, आरोप, तक्रारीतून भाजपला घरचा आहेर देत असल्याची टीका शिवसेनेचे (shiv sena) जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी पत्रकाद्वारे केली.

शिवसेनेच्या पत्रकाचा आशय असा धुळेकरांचा विश्वासघात करत भाजपने सत्ता मिळवली. सुरवातीचे वर्ष सोडले तर भाजपला काम करता यावे यासाठी विरोधाला विरोध न करता सत्य वारंवार मांडत आहोत. जनतेला पिण्याचे पाणी मिळत नाही. स्वच्छतेचा प्रश्‍न कायम आहे. भूमिगत गटारींचा विषय गंभीर बनला आहे. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना संथगतीने होत आहे. महापालिकेत गैरकारभार होत आहे. भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराला आणि कचरा संकलन ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी शिवसेनेने प्रशासनाकडे वेळोवेळी केली आहे. तरीही प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही. याउलट गैरकारभाराला खतपाणी घातले जात आहे.

समस्‍यांचाच पाढा

नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी शिवसेनेने आतापर्यंत वाचा फोडलेल्या समस्यांचाच पाढा वाचून दाखवत भाजपला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना केवळ पत्रकबाजी करत नाही, हे पुन्हा भाजपनेच सिद्ध केले आहे. पिण्याचे पाणी, अस्वच्छता, कचरा व भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदारांवर कारवाई, कन्टेन्मेंट झोनसंबंधी सहा लाखांचे बांबू ९५ लाख किमतीचे दाखविणे आदी समस्या, प्रश्‍न भाजपचे सदस्य मनपा सभांमध्ये मांडत आहेत. त्यामुळे विरोधक केवळ पत्रकबाजी करतात, असे बोलण्याचा भाजपला नैतिक अधिकार उरलेला नाही. कुंपणच शेत खात असल्याचे शिवसेनेने दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजपचा घडा भरल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाचा संकटकाळ गेल्यानंतर महापालिकेबाबत सर्व लेखाजोखा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला जाईल. त्यात गैरकारभाराच्या लेखापरीक्षणाची मागणी केली जाईल, असे जिल्हाप्रमुख माळी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, माजी नगरसेवक मनोज मोरे, संघटक राजेश पटवारी यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com