कॉंग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क यात्रा  सोमवारपासून इगतपुरीतून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

नाशिक : गटबाजीमुळे मरगळ आलेल्या कॉंग्रेस पक्षाला पुन्हा संजीवनी मिळवून देण्यासाठी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या वतीने कॉंग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले असून तिचा शुभारंभ सोमवारी (ता.14) इगतपुरी येथून करण्यात येणार आहे. 

नाशिक जिल्हा व शहर कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे संघटनेला, पक्षाला आलेली मरगळ दूर करुन नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यात युवक व विद्यार्थी कार्यकर्त्यांची ताकदवान फळी तयार करण्यासाठी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत कॉंग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क यात्रेचे नियोजन करण्यात आले. 

इगतपुरी येथील प्रसिद्ध घाटनदेवी मंदिराजवळ सकाळी नऊ वाजता या कॉंग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क यात्रेचा शुभारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ।नयना गावित यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शहर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष ऍड. आकाश छाजेड, लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, नगरसेवक राहुल दिवे, जिल्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील आव्हाड, जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार, अश्विनी आहेर, माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश पवार, युवक कॉंग्रेस लोकसभा अध्यक्ष सचिन कोठावदे, भारत टाकेकर, प्रदेश एनएसयुआय सरचिटणीस नितीन काकड, नाशिक जिल्हा एनएसयुआय अध्यक्ष राहुल कदम आदी उपस्थित राहणार आहेत. 
 
Web Title: maratjhi news congress