बाजार समिती उपसभापतीची बिनविरोध निवड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

जळगाव जामोद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे संचालक सहदेवराव सपकाळ यांची बिनविरोध निवड झाली. शांताराम धोटे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. तालुक्यातील भेंडवड बु. चे रहिवासी असलेले सपकाळ यांचा एकमेव अर्ज उपसभापती पदासाठी दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर टी अंभोरे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस नेते प्रसेनजीत पाटील यांची एकहाती सत्ता आहे. शहादेवराव सपकाळ यांचे निवडीमुळे काँग्रेस च्या एका निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना काँग्रेसजणांमध्ये आहे. ह्या निवडी प्रसंगी सभापती प्रसेनजीत पाटील यांचेसह सहयोगी संचालक अशोक दाय्या, विश्वासराव पाटील, शांताराम धोटे, अशोक गवळी गजानन सरोदे, पप्पू गावनडे व इतर संचालकांची उस्थिती होती. यांची उपस्थिती होती.

निवडीनंतर छोटेखानी सत्कार समारंभास महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अॅड ज्योतिताई ढोकने, माजी नागराध्यक्षा डॉ स्वातीताई वाकेकर, काँग्रेस नेते रंगराव देशमुख, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश उमरकर, जिल्हा सरचिटणीस बालगजानन पाटील, युनूस खान, शहर अध्यक्ष अर्जुन घोलप, तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ, शहर महिला अध्यक्षा लताताई तायडे, दादाराव धंदर सह काँग्रेस व मित्रपक्षाचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Market Committee elected unopposed