चौथ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या ज्योतीसह टोळीचा पर्दाफाश

अमोल खरे
रविवार, 23 जून 2019

लबाडी करत अनेकांना गंडविणाऱ्या बंटी आणि बबलीचा चित्रपट आपल्याला आठवत असेल. अखेर जादा हुशारी चलाखीमुळे कशापध्दतीने बंटी,बबलीला पोलिसांच्या ताब्यात सापडतात. काहीसा असाच प्रकार ज्योती नामक बबलीने एक दोन नव्हे तर चारवेळा शुभमंगल करत नवरोबांना रेशीमगाठीत अडकत त्यानंतर गंडा घालण्याचा प्रयत्न केला. पण चौथ्या वेळेस सावध झालेल्या नवरोबांमुळे पैशासाठी फसवणूक करणाऱ्या बबली टोळीचा पदार्फाश झाला आणि सर्वांच्या हाती बेड्या पडल्या.

मनमाड - लबाडी करत अनेकांना गंडविणाऱ्या बंटी आणि बबलीचा चित्रपट आपल्याला आठवत असेल. अखेर जादा हुशारी चलाखीमुळे कशापध्दतीने बंटी,बबलीला पोलिसांच्या ताब्यात सापडतात. काहीसा असाच प्रकार ज्योती नामक बबलीने एक दोन नव्हे तर चारवेळा शुभमंगल करत नवरोबांना रेशीमगाठीत अडकत त्यानंतर गंडा घालण्याचा प्रयत्न केला. पण चौथ्या वेळेस सावध झालेल्या नवरोबांमुळे पैशासाठी फसवणूक करणाऱ्या बबली टोळीचा पदार्फाश झाला आणि सर्वांच्या हाती बेड्या पडल्या. एका लग्नाच्या गोष्टीला इथे पूर्णविराम मिळाला असला तरी अजून कीती लोकांची फसवणूक केली आहे का याचा तपास पोलीस करत आहे 

एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाशी घटना मनमा़मध्ये उघडकीस आल्याने फसवलेल्या नवरोबांची झोपच  उडाली आहे पैशासाठी नावे बदलत गुपचूप लग्न लावून सर्वांचीच फसवणूक केल्याचे यातून आढळले.                  

मनमाड येथील संभाजी नगर मधील रहिवासी अशोक जगन्नाथ डोंगरे यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता.यातच त्यांची ओळख पुजा भागवत गुळे राहणार अहमदपूर जिल्हा लातूर या महिलेशी झाली माझ्या बघण्यात एक मुलगी आहे. तुम्हाला त्यांना काही पैसे द्यावे लागतील ते गरीब आहेत असे सांगून तिने बंडू नामदेव केंद्रे राहणार अहमदपूर जिल्हा लातूर यांची मुलगी ज्योती हिच्याशी विवाह लावून दिला.यात ४० हजार रुपये रोख व ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकुण ९० हजार रुपये खर्च दिला लग्न झाल्यानंतर १४ दिवस ज्योती इथे राहिली व माहेरी गेली.

आणि प्रकार उघड होऊ लागले

काही दिवसांनी अशोक डोंगरे हे त्यांच्यां मुलाला घेऊन ज्योतीला आणण्यासाठी गेले त्यावेळी सागर पालवे या तरुणांशी ज्योतीचा विवाह होत असल्याची माहिती त्यांना मिळाली याबाबत माहिती घेतली असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला आणि आपण फसलो गेलो असल्याचे समजताच त्यांनी मनमाड शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली व बंडू नामदेव केंद्रे त्याची पत्नी विमल बंडू केंद्रे, मुलगी ज्योती,व मध्यस्थी पूजा भागवत गुळे व विठ्ठल पांडुरंग मुंडे सर्व राहणार अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या विरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. या सर्व घटनेची माहिती घेत प्रभारी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी वरिष्ठांना माहिती देत वरील सर्वांवर फसवणूक यासह विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला व तपासाची चक्रे फिरवली.

सापळा रचत अखेर टोळीला अटक
हा  सर्व प्रकार मिटविण्यासाठी केंद्रे आणि मध्यस्थी मनमाड येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी सापळा रचुन या टोळीला शिताफीने अटक केली.याबाबत अधिक तपास प्रभारी पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खैरनार करत आहे.या चार जणांव्यतिरिक्त अजून किती जणांना फसविले आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage Cheating Crime