ठाकरे कुटुंबातील सातवा विवाह साखरपुड्यातच

दगाजी देवरे
सोमवार, 2 एप्रिल 2018

अलिकडे कुटुंबातील मुले-मुली ऐकत नाहीत असे सांगितले जाते.परंतु आमच्या परिवारातील सर्व मुले शिस्तीत आहेत.चागं ले वा वाईट ते समजतात.म्हणून असे आदर्श विवाह करणे शक्य होते.
- अशोक महारू ठाकरे, माजी सरपंच, नवडणे.

धुळे म्हसदी : 'विवाह म्हटला, की ऐपतीप्रमाणे खर्च करा,कर्जबाजारी होऊन नका असे केवळ प्रबोधन केले जात असले तरी ग्रामीण भागात कर्ज काढून प्रसंगी शेती विकून असे सोहळे धुमधडाक्यात साजरे केले जातात.एकीकडे ही परिस्थिती असताना एकत्र कुटुंब,आर्थिक कुवत असून  नवडणे(ता.साक्री) येथील ठाकरे कुटुंबाने समाजासमोर आदर्श ठेवत एक वा दोन नव्हे तर चक्क सातवा विवाह साखरपुड्यात केले. सहा भावंडाचे 'ठाकरे ' कुटूंब हे एक आदर्श म्हणता येईल.

धामधूमीत विवाह करण्याची ऐपत असताना कमी वेळ, कमी खर्चात साध्या पध्दतीने विवाह केला. साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाचे उपसभापती अशोक महारू ठाकरे ऊर्फ बाबा यांचे सहा भावंडाचे एकत्र असूनही आदर्श कुटुंब.सहा भावांची तब्बल सतरा मुले. दरवर्षी या परिवारात विवाह अथवा अन्य कार्यक्रम ठरलेलाच.मोठा खर्च करता येणे शक्य असताना एकाच दिवशी साखरपुडा, हळदीचा कार्यक्रम आणि लगेच विवाह.आज सकाळी नवडणेचे सरपंच शरद महारू ठाकरे यांचे चिरंजीव संदिप व भालेर (जि. नंदुरबार) येथील दगा डिगंबर बागूल यांची कन्या रोशनी यांचा साखरपुड्यात साध्या पध्दतीने विवाह संपन्न झाला.ठाकरे कुटुंबातील एक मुलगी व आज सहावा मुलगा म्हणजे सातवा विवाह साध्या पध्दतीने झाला.

विवाह सोहळ्यासाठी गुजरात राज्यातील निझर मतदारसघांचे आमदार तथा सुरतच्या सुमूल डेअरीचे संचालक सुनीलभाई गामीत, डॉ. शिवराम गावीत, बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, संचालक दीपक जैन जिल्हा बॅकेंचे संचालक हर्षवर्धन दहिते, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शेतकरी सहकारी संघाचे सभापती विलासराव बिरारीस,संचालक अविनाश देवरे, शिवसेना तालुका प्रमुख विशाल देसले, काळगावचे उद्यान पंडित संजय भामरे, रामराव टेलर यांची विशेष उपस्थिती होती. राजकीय क्षेत्रात असूनही साध्या पध्दतीने विवाहास पसंती दिल्याचे आमदार गामीत यांनी ठाकरे बंधूचे कौतुक केले.

इतराचांही विचार.....!
विवाह म्हटला म्हणजे यजमानासह नातेवाईक, मित्र परिवाराची धावपळ होते. दुसरीकडे हजारोंना पत्रिका वाटप करताना अपघातही होतात.यावर तोडगा काढत मोबाईलवर संपर्क करून आमंत्रण देण्यात आले.तेही अगदी जवळचे वा मोजकेच. कुटूंबाचे मोठे बंधू अशोक ठाकरे तालुक्यात 'अशोकबाबा 'म्हणून ओळखले जातात. ठाकरे यांचे सहा भाऊ, त्यांची मुले, मुली, सुना, नातवंडे असा चाळीस सदस्यांचा गोतावळा. हे कुटुंब नसून एक परिवारिक संस्था म्हटली तर वावगे ठरू नये. सुमारे शंभर एकर शेतीची सुत्रे कुटूंबातील सदस्य हलवतात. सर्व काही अलबेल असताना साध्या पध्दतीने विवाह करत ठाकरे परिवाराने आदर्श उभा केला आहे. यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी हीच अपेक्षा व्यक्त केली जाईल.

अलिकडे कुटुंबातील मुले-मुली ऐकत नाहीत असे सांगितले जाते.परंतु आमच्या परिवारातील सर्व मुले शिस्तीत आहेत.चागं ले वा वाईट ते समजतात.म्हणून असे आदर्श विवाह करणे शक्य होते.
- अशोक महारू ठाकरे, माजी सरपंच, नवडणे.

Web Title: marriage in Thackeray family Sakri

टॅग्स