डॉ. दिलीप पवार यांच्या समीक्षा ग्रंथाला "मसाप'चा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

नाशिक - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) दर वर्षी दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींसाठीचा शरदचंद्र मनोहर भालेराव पुरस्कार सामाजिक आशयाच्या प्रबंध लेखनासाठी केटीएचएम महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. दिलीप पवार यांच्या "कामगार कवितेतील सामाजिक जाणिवा' या समीक्षा ग्रंथाला जाहीर झाला.

या ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागातर्फे प्रकाशनार्थ विशेष अनुदान प्राप्त झाले आहे. या ग्रंथातून मराठी कामगार कवितेला पाश्‍चात्त्य व भारतीय विचारवंतांचे लाभलेले तात्त्विक अधिष्ठान शोधण्याचा केलेला प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण आहे. कामगार कवितेच्या प्रेरणा, स्वरूप, वैशिष्ट्ये आणि सामाजिक जाणिवा या अंगाने केलेली चिकित्सा व वास्तव मांडणी, हे या ग्रंथाचे बलस्थान आहे.

Web Title: masap award ro samiksha book