मोसम नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू

aambasan
aambasan

आंबासन (नाशिक) - मोसम नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असून यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुजोर झालेल्या वाळुमाफियांवर कुठलाही दरारा नसल्याने महसूल विभाग करतेय तरी काय, पाणी मुरतेय तरी कुठे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.  

मोसम नदीपात्रातील अवैध वाळू उपसा नेहमीचाच बनला असून यामागचे गोडबंगाल तरी काय अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. द्याने (ता.बागलाण) येथील नागरिकांनी अनेक वेळा रास्ता रोको आंदोलन छेडले तसेच काही मुजोर झालेल्या वाळुमाफियांचे वाळूने भरलेले विना परवाना ट्रॅक्टरची तोडफोड करून ग्रामपंचायतीच्या आवारात आणून ठेवले होते. तसेच महसूलच्या काही कर्मचा-यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंबून ठेवले होते. संबंधित विभागाकडून मात्र ठोस कार्यवाही होत नसल्याने वाळुमाफियांची मुजोरी वाढतच चालली आहे. मोसम नदीपात्रातून काही प्रमाणात पुरपाणी सुरू असूनही रात्री काही तरूणांना पाण्यात उतरून वाळू उपसा केला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. या वाळू उपशासाठी तरूण मजूरांना मोठी रक्कम मिळत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका तरूण मजूराने माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच मालेगाव तालुक्यातील संवदगाव येथे अवैधरित्या उपसा करतांना एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही महसूलच्या आधिका-यांना जाग येत नसल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपूर्वी मोसम नदीपात्रातून एका ठिकाणी भरदिवसा वाळू वाहतूक करण्यासाठी चक्क ग्रामपंचायत कार्यालयातील घंटागाडीची ट्रॉली वापरण्यात आल्याचे बोलले जाते. मोसम नदीपात्रातील होणा-या अवैधरित्या वाळू उपशाकडे महसूल विभाग दुर्लक्ष का करीत आहे याबाबत चर्चेला उधाण आले आहे. भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भिती नागरिकांमधून व्यक्त केली आहे. नदीपात्रातील होणा-या वाळू उपसा कोणाच्या वरदहस्तने सुरू आहे याबाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. यापुढे वाळू उपसा करणा-यांवर महसूल विभाग काय कार्यवाही करते याकडे मोसमवाशियांचे लक्ष लागून आहे. 

आम्ही अनेक वेळा अवैध वाळू उपशाबाबत आंदोलने छेडले समजूत काढण्यासाठी थातुरमातुर कार्यवाही केली. महसूल विभागाचे लागेबांधे असल्याशिवाय मुजोर झालेले वाळुमाफिया वाळू उपसा करण्याची हिम्मतच करणार नाही.
मधुकर कापडणीस, माजी उपसरपंच द्याने.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com