मुंजवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, झाडे पडल्याने वाहतुक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

सटाणा : मुंजवाड (ता.बागलाण) परिसरात आज बुधवार (ता.२०) रोजी दुपारी एकनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसात घरांवर मोठे वृक्ष कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील रस्त्यांवरही ठिकठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली होती. तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

मुंजवाड सह परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. त्यातच हवामान खात्याने पाऊस लांबल्याचा अंदाज वर्तवल्यामुळे पेरण्या लांबण्याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र आज दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन दिड वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. मोठ्या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग आनंदात असला तरी या वाढली पावसात मुंजवाड परिसरातील रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे मोडून पडल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. या पावसात बापु नानाभाऊ जाधव (रा.मुंजवाड) यांच्या शेतात काम करनारे मजुर देवराम भिला वाघ यांच्या घरावर आंब्याच्या वृक्षाची मोठी फांदी तुटून पडल्याने घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

यावेळी त्यांचा आठ वर्षाचा नातु किसन छोटु तलवारे याच्या डोक्यावर विट पडल्याने तो किरकोळ जखमी झाला. संपूर्ण कुटुंब बाहेर पाऊस सुरू असल्याने घरात बसले होते. जोरदार वादळामुळे घराशेजारीच असलेल्या आम्र वृक्षाची मोठी फांदी घरावर पडली. सुदैवाने फांदीचे दोन टोक जमिनीला टेकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच वामन विठ्ठल जाधव यांच्या शेतातील अवजारे ठेवण्याच्या खोलीचे पत्रे उडून शंभर मिटर अंतरावर जाऊन पडले. या ठिकाणी कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

या वादळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीची कामे करता येणार आहे. येत्या आठ दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर या परिसरात पेरणीच्या कामांना गती येईल. नुकसान झालेल्या नागरीकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य सदस्या मिना मोरे यांनी केली आहे.

Web Title: Massive rain accompanied by windy winds in Munjwad, traffic jam due to trees fell