शहरात 469 केंद्रांवर  होणार मतदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

शहरात 469 केंद्रांवर 
होणार मतदान 

शहरात 469 केंद्रांवर 
होणार मतदान 

जळगावः जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदान यादी सोमवारी (2 जुलै) महापालिका प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार प्रशासनाने मतदान केंद्र यादी तयार केली असून, शहरातील 469 केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रभाग पाचमध्ये सर्वाधिक मतदार संख्या असल्याने या प्रभागात सर्वाधिक मतदार केंद्र आहे. तर सर्वांत लहान केंद्र प्रभाग सहामध्ये असून याची मतदार संख्या 420 इतकी आहे. 
महापालिकेची एक ऑगस्टला निवडणूक होणार असून, प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेचे काम जोरात 
सुरू आहे. त्यानुसार आज मतदान केंद्रांची यादी तयार केली. शहरातील 3 लाख 65 हजार 72 मतदारांचे 19 प्रभागानुसार 469 मतदान केंद्र निश्‍चित केले आहे. एका मतदान केंद्रावर आठशेपेक्षा अधिक मतदान असेल, असे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले. 

प्रभाग पाच 34 मतदान केंद्र 
प्रभाग पाचमध्ये 27 हजार 216 मतदार आहेत. त्यानुसार या प्रभागात सर्वाधिक 34 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तर सर्वांत कमी 11 हजार 534 मतदार संख्या असलेला प्रभाग 19 मध्ये 15 मतदान केंद्र असणार आहे. 

 
प्रभाग निहाय मतदान केंद्र 

प्रभाग मतदान केंद्र मतदार संख्या 
1....................23...............18,194 
2....................27...............20,799 
3....................25...............19,672 
4....................32...............24,762 
5...................34................27,216 
6....................24...............18,494 
7....................25...............19,529 
8....................25................19,828 
9.....................21...............16,082 
10..................25................19,687 
11...................29...............22,657 
12...................26................18,605 
13...................23................17,896 
14...................26.................20,487 
15...................20.................16,141 
16...................26.................20,190 
17...................22..................17,020 
18...................21..................16,279 
19...................15..................11,534 
 

Web Title: matdan