देशात नाशिकमध्ये सर्वाधिक जिम - आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

नाशिक - विकास आराखड्यात मोकळे भूखंड राखीव ठेवण्याची तरतूद आहे; परंतु नाशिकमध्ये सर्रास त्यावर बांधकामे केली जात असल्याने शासनाचा उद्देश सफल होत नाही. त्यामुळे मोकळे भूखंड तसेच ठेवून नवी मुंबईच्या धर्तीवर एक किलोमीटर जागा असेल तेथेच जॉगिंग ट्रॅक व ज्येष्ठांसाठी विरुंगळा केंद्रे निर्माण केली जातील, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

ग्रीन जिमबाबतच्या तक्रारींवर आयुक्तांनी देशात नाशिकमध्ये सर्वाधिक ग्रीन जिम असल्याचा गौप्यस्फोट करून लोकप्रतिनिधींचे ग्रीन जिम प्रेमदेखील अधोरेखित केले.

‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात नागरिकांच्या तक्रारी सोडविताना आयुक्त मुंढे यांनी साकारायच्या काही प्रकल्पांची माहिती देताना शहरात आरोग्याच्या दृष्टीने आतापर्यंत झालेल्या कामांच्या त्रुटीही दाखविल्या. शहरात रस्त्यांचा विकास ठराविक भागात झाला असून, ग्रामीण भागातील रस्त्यांवर अजून खडी टाकली गेली नाही. त्यामुळे त्या रस्त्यांना प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी अडीचशे कोटींची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी आकारलेल्या दरांत कपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट करताना जॉगिंग ट्रॅकवर काँक्रिट टाकण्यास विरोध केला. पेव्हरब्लॉक टाकण्यासंदर्भात अभ्यासाअंति निर्णय घेऊ. दोनशे, तीनशे मीटर क्षेत्रात जॉगिंग ट्रॅक शक्‍य नाही. एक किलोमीटर जागा असेल तरच जॉगिंग ट्रॅक होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्रे उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रीमियम एफएसआयचे दर वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी त्यांनी फेटाळली.

आयुक्त म्हणाले... 
 सहा महिन्यांत ई-मेलद्वारे मालमत्ता देयके देणार
 पार्किंगची व्यवस्था नसल्यास दुकानदारांवर कारवाई
 कचरा विलगीकरण न झाल्यास दंडात्मक कारवाई
 अधिक पाणी वापरल्यास अधिक बिले देणार
 शहरात लवकरच महापालिकेची बससेवा

Web Title: maximum Gym in Nashik