एमबीबीएस, बीडीएसची उद्या दुसरी निवड यादी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नाशिक - एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. याअंतर्गत दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांची निवड यादी रविवारी (ता.12) जाहीर होणार आहे. यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 18 ऑगस्टपर्यंत मुदत असेल. एमबीबीएसची प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत, तर बीडीएसची प्रक्रिया 15 सप्टेबरला संपेल.

पहिल्या मॉपअप फेरीसाठी निवड यादी 21 ऑगस्टला जाहीर होईल. त्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 26 ऑगस्टपर्यंत मुदत असेल. यानंतर 27 ऑगस्टला एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या रिक्‍त जागा संबंधित खासगी महाविद्यालयांना प्रत्यार्पित केल्या जाणार आहेत. संस्था पातळीवर जागा भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत असेल.

बीडीएसचा दुसरी मॉपअप फेरी
बीडीएस या दंतशास्त्र अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या मॉपअप फेरीची यादी 6 सप्टेंबरला जाहीर होईल. यात नाव असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 11 सप्टेंबरपर्यंत मुदत असेल, तर 12 सप्टेंबरपर्यंत रिक्‍त जागा संबंधित खासगी महाविद्यालयांना प्रत्यार्पित करण्यात येतील. संस्था पातळीवर जागा भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत असेल.

Web Title: MBBS BDSS second selection list education