साडेपाच लाखांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नाशिक - पाथर्डी फाटा परिसरातून बंदी असलेला "एमडी' हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून मध्यरात्री अटक केली. रणजित गोविंदराव मोरे, पंकज भाऊसाहेब दुंडे आणि नितीन भास्कर माळोदेया संशयितांना सुमारे पाच लाख 30 हजारांच्या 265 ग्रॅम एमडी अमली पदार्थांसह अटक केली.

तिघांपैकी पंकज दुंडे व नितीन माळोदे 2012 मधील दरोड्यातील गुन्हेगार आहेत. न्यायालयाने तिघांना शनिवारीपर्यंत (ता. 19) पोलिस कोठडी सुनावली. संशयितांच्या प्राथमिक चौकशीतून ड्रग्जचे मुंबई- नाशिक संबंध पुन्हा एकदा उघडकीस आले. संशयितांनी एमडी ड्रग्ज मुंबईतून खरेदी करून नाशिकमध्ये विक्रीसाठी आल्याचे समोर आले आहे.

Web Title: MD Drugs Seized Crime