काश्मिर खोऱ्यात उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांची उल्लेखनीय कामगीरी

kashmir
kashmir

नाशिक : काश्मिर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु, अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे. यासाठी केवळ चर्चा न करता कृती करत उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी गेल्या १० दिवसात काश्मिरातील सीमावर्ती भागात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्याचे अनमोल कार्य पार पडले. जळगावचे डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन' व भारतीय सैन्य दलाच्या मदतीने वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नाशिकमधील बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे ऋषिकेश परमार आणि श्रीनगर येथील खुर्शीद भट यांनी शिबिराची आखणी केली.


या शिबीरात डॉ. अभिजित रामोळे, डॉ.नितीन शाहीर, डॉ. निकिता चंडोले, डॉ. सोहम चंडोले, डॉ. रेखा चंडोले, डॉ. विलास चंडोले, डॉ. योगेश पवार, डॉ. प्रभाकर बेडसे, डॉ. सतीश साळुंखे, डॉ. विवेक जोशी, डॉ. योगेश पंजे, ऋषिकेश परमार आदी महाराष्ट्रातील डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम केले. भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून काश्मिरातील बांदीपुरा सेक्टर, अजस सेक्टर, संभल सेक्टर, गांदरबल सेक्टर, अशमुकम सेक्टर, नाहीदकाही सेक्टर, बारामुल्ला सेक्टर, द्रास, कारगिल, मानसबल कंगण अशा अतिसंवेदनशील भागात वैद्यकीय सेवा पुरवली. या शिबीरात तब्बल 4500 रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. यासाठी भारतीय सैन्याने औषधींचा साठा उपलबध करून दिला. सोबतच डॉक्टरांच्या चमूने महाराष्ट्रातून सोबत आणलेली सुमारे एक लाख रुपयांची औषधी रुग्णांनमध्ये वितरित केली. डॉक्टरांच्या या समाज कार्याला 3 आरआर, 5आरआऱ, 13आरआऱ, 14आरआर, 24आरआर या राष्ट्रीय रायफल बटालियन च्या जवानांचे सहकार्य लाभले.
  
रुग्णांचे वाचविले प्राण 
परतीच्या प्रवासादरम्यान दिल्लीहुन विमानतळावर गोहट्टी येथील एक प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली. तेव्हा या डॉक्टरांच्या चमूने त्या रुग्णाला औषोधपचाराने स्थिर केले. विमानातील अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पाठवले. यामुळे विमान 1 तास उशिराने निघाले. विमानातील, प्रवासी अधिकाऱ्यांनी सर्व डॉक्टरांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. 
डॉ.धर्मेंद्र पाटील यांचे मोलाचे सहकार्य : 
 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन'चे संस्थापक अधिक कदम असून, डॉ धर्मेंद्र पाटील हे समन्वयक तसेच 'आर्या फाउंडेशन'चे अध्यक्ष आहेत. त्यांच्या साथीला ऋषीकेश परमार यांच्या मदतीने सुमारे ३०० अनाथ मुलींचा सांभाळ देखील जम्मू, अनंतनाग, कुपवाडा, 
बिरवाह, श्रीनगर येथील अनाथालयात केला जातो. याआधीही या संस्थेद्वारे काश्मीरखोऱ्यातील पुरग्रस्त भागात  ४० डॉक्टरांच्या चमूने दीड महिना साडे तीन लाख रुग्णांना सेवेचा लाभ दिला होता. तसेच गेल्या दशकापासून दरवर्षी काश्मीर खोऱ्यातील गरजूंसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जाते. 
या संस्थेने काश्मीर खोऱ्यात 'इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस' सुरू केली असून, यासाठी १० अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहीका काश्मीर खोऱ्यात कार्यरत आहेत. गेल्या वर्षी दगडफेक, पॅलेट गनच्या दुखापतीमुळे दृष्टी गमावलेल्या ९०० रुग्णांवर संस्थेच्यावतीने श्रीनगर येथे डॉ. नटराजन आणि टीमने शस्त्रक्रिया केल्या होत्या. 

"काश्मिरी जनतेचं मन परिवर्तन करणं जरी कठीण असलं, तरी अशक्य काहीच नाही, या विचाराने आरोग्य सेवेच्या रूपाने हे  छोटसं, पण  देशाच्या उज्वल भविष्यासाठीचं एक पाऊल आहे. केवळ भारतीय सैनिकांचीच ही जबाबदारी नसून आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे हाच या कार्यामागचा उद्देश आहे."
डॉ. धर्मेंद्र पाटील, समन्वयक, बोर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन तथा अध्यक्ष, आर्या फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com