सोशल मीडियावरील आवाहनाने वैद्यकीय मदत

Medical help by appealing to social media
Medical help by appealing to social media

येवला : माणुसकी जिवंत असल्याने अवघ्या दहा हजारांसाठी उपचारासाठी अडकून पडलेल्या रुग्णाला येथील दानशुरांनी मदतीचा हात पुढे करत सढळ हाताने मदत केली आहे. यामुळे शस्त्रक्रीयेच्या साहित्याची खरेदी करून या रुग्णावर उपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वसामान्यांसह भागवत बंधूनी त्वरित मदतीचा हात देत सामाजिक आदर्श जपला आहे.

चांदगाव येथील पण सध्या खंडाळा (ता.वैजापूर) येथे वास्तव्यास असलेल्या सुधाकर झाल्टे या शेतमजूराच्या शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदीसाठी पैसे नव्हते. अवघ्या 10 हजारांसाठी त्यांच्यावरील उपचार रखडले होते. हि माहिती मिळताच सोशल मीडियावरून 10 हजार रुपयाच्या मदतीसाठी दिनेश राऊत यांनी आवाहन केल्यानंतर या आवाहनाला अनेकांनी कोण, कुठला हा विचार न करता प्रतिसाद दिला आहे. नारायनगिरी महाराज फाउंडेशनचे संस्थपक अध्यक्ष विष्णू भागवत व उपसभापती रुपचंद भागवत या बंधूंसह इतरांनी यासाठी तत्परता दाखवत मदत देऊ केली. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे झाल्टे योग्य उपचार होऊन ते आपले नियमित काम पुन्हा करू शकणार आहे. राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 24 तासाच्या आत 13 हजार 640 रुपये मदतीनिधी जमा झाला.

झाल्टे पंधरा दिवसापासून औरंगाबाद येथील घाटी या शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या हातामध्ये पुर्वी रॉड टाकलेला होता. पण इजा होऊन तो रॉड तुटला. यावरील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली नसल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. घाटी मध्ये शस्त्रक्रियेसाठी कुठलेही पैसे घेतले जात नाही. परंतु सर्व साहित्य तसेच इंजेक्शन, औषधे हे रुग्णाला बाहेरुन आणावी लागतात. झाल्टे यांना रक्त पुरवठा हि करावा लागणार होता. 

मात्र, आर्थिक परीस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने एवढे पैसे जमवणे त्यांना शक्य होत नव्हते. यामुळे मदतीसाठी पुढे येत उद्योजक विष्णू भागवत व उपसभापती रुपचंद भागवत तसेच कुणाल धुमाळ, शरद गायके, अंकुश खैरे, सुनील राठी, राजेंद्र आवतारे, अतुल कुलसौंदर, भागवत सोनवणे, पी.के.काळे, शैलेश गाडे, रमेश देसले, अरुण लभडे, डॉ.श्रीकांत काकड, वैभव पवार, विशाल घोटेकर, राजुभाई शेख, योगेश भगत, अक्षय गुडघे, संतोष विंचू, मंगेश सुल्ताने, कृष्णा गुडघे,  बाळकृष्ण शिंदे, अक्षय अजरेकर, विष्णुपंत खेडकर, संतोष लोहार, विनायक कुलकर्णी, बाळासाहेब दाणे यांनी यांनी मदतीसाठी हात पुढे केला. व मदत ताबडतोब आरटीजीएस करून दिनेश राऊत यांच्यामार्फत गरजुंपर्यंत पोहचवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com