मेडिकल टॉपर बनली जैन साध्वी

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

मालेगाव - वैद्यकीय परीक्षेत राज्यात टॉपर असलेल्या एका मुलीने जैन साध्वी होण्याचा निर्णय घेतला आहे. मालेगावमधील हीना हिंगाड या मुलीने सूरत येथील आचार्य यशोवर्मा सुरीश्‍वर यांच्याकडून दीक्षा घेतली आहे.

मालेगाव - वैद्यकीय परीक्षेत राज्यात टॉपर असलेल्या एका मुलीने जैन साध्वी होण्याचा निर्णय घेतला आहे. मालेगावमधील हीना हिंगाड या मुलीने सूरत येथील आचार्य यशोवर्मा सुरीश्‍वर यांच्याकडून दीक्षा घेतली आहे.

हीना ही तिच्या पालकांची सर्वांत मोठी मुलगी आहे. अभ्यासात हुशार असलेल्या हीनाला दहावीत 94 टक्के; तर बारावीत 84 टक्के गुण होते. वडिलांच्या स्वप्नानुसार तिने एमबीबीएस डॉक्‍टर होण्याचे ठरविल्यानंतर ती प्रवेश परीक्षेमध्ये राज्यात टॉपर होती. तिने मुंबईसह मालेगाव आणि डहाणू येथे वैद्यकीय प्रॅक्‍टिसही केली आहे. मात्र, 17 वर्षांची असल्यापासून अध्यात्माकडे निर्माण झालेली ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने 45 दिवसांचे उत्थान तपही केले आहे. विवाहाला वारंवार नकार देतानाच साध्वी होण्याची इच्छा असल्याचे ती घरच्यांना सांगायची. अखेर, तिचा हा निर्णय घरच्यांनीही आनंदाने स्वीकारल्यानंतर तिने आता दीक्षा घेतली आहे. यापुढे ती विशारद माताजी म्हणून ओळखली जाणार आहे. आतापर्यंत हिंगाड कुटुंबीयांमधील तीन जणांनी दीक्षा घेतली आहे.

Web Title: Medical topper heena hingad jain sadhvi