जिरलेला पैसा शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

जिरलेला पैसा शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
जिरलेला पैसा शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

नाशिक - जिल्ह्यातील एकूण उलाढालीच्या प्रमाणात रिझर्व्ह बॅंकेकडून नवीन नोटा येत असल्या, तरी गरजूंना कमी अन्‌ साठेबाजांच्याच हाती जास्त नोटा जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंक अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. मात्र, 525 बॅंका आणि 95 टपाल कार्यालयांतील हजारो काउंटरवरून जाणाऱ्या पैशावर व व्यवस्थापकांवर येत असलेल्या मर्यादा या बैठकीत पुढे आल्या. त्यामुळे बैठक झाली खरी, पण बॅंकांना उलाढालीच्या प्रमाणात रोकड द्यावी, की सरसकट एकाच समन्यायाने रोकड दिली जावी, हा कळीचा मुद्दा कायमच आहे. चलनात नव्याने येणाऱ्या नोटा साठेबाजांऐवजी गरजूंच्याच हाती कशा पोचणार?, याच्या व्यवस्थेबाबत शंकाही कायमच आहे.


रिझर्व्ह बॅंकेकडून चलनात पुरेशा प्रमाणात नोटांची आवक सुरू आहे. हजार कोटींपेक्षा जास्त नवीन नोटा येऊनही त्या गरजूंपर्यंत पोचलेल्या नाहीत. किंबहुना बाद नोटा बदलण्यास इच्छुकांपर्यंत त्या जास्त प्रमाणात जात असल्याने, नवीन चलन डम्प होऊन गरजूंची त्रेधातिरपीट सुरू आहे. म्हणूनच आलेल्या नोटांच्या वितरणाच्या हिशेबात लक्ष घालण्याची वेळ आली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत बॅंक अधिकाऱ्यांकडून त्याविषयीच अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते. चलनटंचाईच्या या स्थितीबाबत नेमके चित्र काय आहे, याविषयी जिल्हा यंत्रणा मौनात आहे. बॅंकांकडून आवश्‍यक प्रतिसाद मिळतच नाही. अशी स्थिती असल्याने आज हा दुरावा पुढे येऊ नये म्हणून पत्रकारांना बैठकीला मज्जाव केला गेला.

सहकारी बॅंकांचे दुखणे
सहकारी बॅंकांचे दुखणे आणखी वेगळे आहे. जिल्ह्यात 29 सहकारी बॅंकांना चलन घेण्यासाठी वेगवेगळ्या बॅंकांशी जोडले आहे. सहकारी बॅंकांकडून पैशाची मागणी वाढत आहे. प्रचंड प्रमाणात पैसे जमा होत असताना, त्या प्रमाणात बॅंकांना रोखता मिळत नसल्याचे सहकारी बॅंकिंगचे दुखणे आहे. बॅंकिंग नियमानुसार ठेवींच्या प्रमाणात सीडी रेशो रोखता याचे प्रमाण ठेवण्यासाठी सहकारी बॅंका आग्रही आहेत. पण जिल्हा यंत्रणेकडून ती गरजच भागवली जात नसल्याची सहकारी बॅंकांची तक्रार आहे. त्यामुळे दैनंदिन उलाढालीच्या प्रमाणात रोकड द्यावी की सरसकट एकाच न्यायाने सर्वांना समान रक्कम दिली जावी, असा हा आर्थिकदृष्ट्या काहीसा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे सहकारी बॅंकांनी बॅंकिंग चेस्टविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सहकारी बॅंका..............................करन्सी चेस्ट
नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह..................बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया
जनलक्ष्मी बॅंक..................स्टेट बॅंक ऑफ इंडिया
जिल्हा महिला सहकारी बॅंक.................. स्टेट बॅंक ऑफ इंडिया
जिल्हा महिला विकास सहकारी बॅंक.................. स्टेट बॅंक ऑफ इंडिया
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंक.................. आयडीबीआय
श्री समर्थ को-ऑपरेटिव्ह बॅंक.................. बॅंक ऑफ बडोदा, शरणपूर
गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक.................. आयडीबीआय, एम. जी. रोड
विश्‍वास को-ऑपरेटिव्ह.................. बॅंक सेंट्रल बॅंक
जिल्हा गिरणा सहकारी बॅंक.................. स्टेट बॅंक ऑफ इंडिया
महेश को-ऑपरेटिव्ह.................. बॅंक सेंट्रल बॅंक, सातपूर
राजलक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक.................. स्टेट बॅंक, नाशिक रोड
जनसेवा को-ऑपरेटिव्ह.................. बॅंक सेंट्रल बॅंक, सातपूर
फैज मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह.................. बॅंक युनियन बॅंक, सातपूर
जनकल्याण को-ऑपरेटिव्ह बॅंक.................. युनियन बॅंक, सातपूर
नाशिक रोड-देवळाली व्यापारी बॅंक.................. स्टेट बॅंक, नाशिक रोड
बिझनेस को-ऑपरेटिव्ह बॅंक.................. स्टेट बॅंक, नाशिक रोड
जिल्हा इंडस्ट्रिअल ऍण्ड मर्कंटाइल बॅंक.................. स्टेट बॅंक, जुना आग्रा रोड
श्री गणेश सहकारी बॅंक.................. स्टेट बॅंक, नाशिक रोड
इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह लि................... स्टेट बॅंक, जुना आग्रा रोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com