पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विभागनिहाय बैठका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

जळगाव - महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी (ता. 21) जळगाव दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी सकाळपासून बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. 

मंत्री पाटील सकाळी नऊला अजिंठा शासकीय विश्रामगृहात थांबतील. सकाळी दहाला कृषी कार्यालयातील योजनेचा प्रारंभ, सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत कृषी विभागाचा आढावा, दुपारी बारा ते एक या वेळेत दक्षता समितीची बैठक, दुपारी एक ते दोन या वेळेत टंचाई व जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या आढावा बैठका नियोजन भवनात होतील. दुपारी तीन ते चार या वेळेत विश्रामगृहात महापालिकेशी संबंधित प्रश्‍नांवर बैठक, दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा, सायंकाळी साडेपाचला पोलिस दलाने विविध चौकांत व प्रमुख मार्गांवर लावलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण, साडेसहाला व. वा. वाचनालयास भेट, सातला विश्रामगृहात एमआयडीसीतील उद्योजकांशी ते चर्चा करतील. रात्री अमरावती- मुंबई एक्‍स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा आहे. 

Web Title: Meetings in the presence of Guardian Minister