मेहरूण चौपाटीवर यंदा ४१ फुटी रावणाचे दहन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

जळगाव - विजयादशमीला (दसरा) मेहरुण तलावात करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम यंदाही होणार असून रावण दहनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारी (ता.११) विजयादशमीला ४१ फुटी रावणाचे दहन केले जाणार आहे. यंदाचा उत्सव पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला जाणार आहे. 

जळगाव - विजयादशमीला (दसरा) मेहरुण तलावात करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम यंदाही होणार असून रावण दहनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारी (ता.११) विजयादशमीला ४१ फुटी रावणाचे दहन केले जाणार आहे. यंदाचा उत्सव पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला जाणार आहे. 

पंचमुखी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत होता. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून मंडळातर्फे रावण दहनाचा कार्यक्रम बंद केल्याने जळगावातील ही परंपरा सुरू राहण्याच्या उद्देशाने एल. के. फाऊंडेशनतर्फे रावण दहन कार्यक्रम आयोजित करत आहे. एल. के. फाउंडेशनचे यंदाचे चौथे वर्ष असून, गेल्या चार-पाच दिवसांपासून मेहरुण तलावावर जोरदार तयारीही सुरू आहे. विजयादशमीला सायंकाळी सातला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते रावण दहन होणार असून, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा हे उपस्थित राहणार आहे.

पर्यावरणपूरक उत्सव
रावणाची ४१ फुटांची प्रतिकृती कलाकार राजेश नाईक व त्यांचे सहकारी साकारत आहेत. रावणाच्या प्रतिकृतीला डिजिटल लुक देण्यात आला आहे. पर्यावरण उत्सव करण्यासाठी लोखंडी ढाचा तयार करून त्यावर गोणपाट, सॅटिन कापड व कडब्याचा वापर केला जात आहे. पूर्वी रावण बनविण्यासाठी होणारा बांबू, लाकडाचा वापर वगळण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

चार लाखांच्या फटाक्यांची आतषबाजी
४१ फुटी रावणाची प्रतिकृती साकारण्यात येत असून, नयनरम्य अशी आतषबाजी पाहण्यास मिळणार आहे. रावणाच्या प्रतिकृतीद्वारे विजयादशमीला सुमारे तीन ते चार लाख रुपयांच्या फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.

Web Title: Mehrun beach 41 feet Ravana Dahan

टॅग्स