मेहूल चोक्सीचा नाशिकमध्ये 3810 कोटीचा गंडा

mehul choksi fraud in Nashik
mehul choksi fraud in Nashik

नाशिक : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार कोटींचा चुना लावून देशातून फरार झालेल्या मेहुल चोकसी याने 'सेझ'अंर्तगत नाशिकला इगतपुरीत मुंढेगाव येथे पाच हेक्‍टर जागा आणि 'नाशिक मल्टी सर्व्हिसेस सेझ लिमिटेड' या नावाने कंपनी स्थापन करून 3810 कोटीचे कर्ज उचलले आहे. विविध 24 बॅकांकडून उचललेल्या कर्जाला आयडीबीआय ट्रस्टशिपने त्याच्या कर्जाचे दायीत्व स्विकारले. त्यामुळेच, त्याच्या 3810 कोटीच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करावी तसेच फरार संशयित मेहूलला साथ देणाऱ्या त्याच्या उपकंपन्यातील इतर संचालकांवर 'ईडी'ने त्वरित कडक कायदेशीर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी पत्रकार परिषदेत केली.

संशयित मेहूल चोक्सीचा घोटाळा पंजाब नॅशनल बँकेपुरता मर्यादित नाही. नाशिकला इगतपुरीत 5 हेक्‍टर जमीन मिळाल्यानंतर एका बॅकेकडे 3 हजार कोटीचे कर्ज मिळविण्यासाठी 52 कोटी रुपये भरले. यात सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही भरडल्या आहेत. बँकेतील सामान्यांच्या ठेवीचा पैशाला बाधा येणार नाही, याची काळजी सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घ्यावी अशी मागणी जानी यांनी केली. 

नाशिकला 100 हेक्‍टरचा घोळ
जानी म्हणाले, ''संशयित मेहूल याने नाशिकला विविध वित्त संस्थाशी करार केले. नाशिक मल्टी सर्व्हिसेसच्या मार्च 2015 च्या लेखा अहवालाप्रमाणे त्याने एसबीआय बँकेकडे बळवंत नगर, मुंढे गाव ( इगतपुरी) येथील 5.03 हेक्‍टर जागा गहाण ठेवून त्यापोटी 52 कोटी शुल्क कंपनी निबंधकाकडे (रजिस्ट्रार ऑफ कंपनी) वर्ग केले. शिवाय वर्किंग कॅपिटल फॅसिलीटी मिळवली. त्यातून दुसऱ्या बॅकेला 3810 कोटीच्या कर्जासाठी 52 कोटीची नोंदणी शुल्क भरले. मेहुलच्या 3810 कोटीच्या कर्जाचे काय झाले. त्यातील किती कर्ज त्याने उचलले आणि उचललेले कर्ज फेडले का? याची 
चौकशी व्हावी. असेही त्यांनी सांगितले. 5 हेक्‍टर जमीन आयसीआयसीआय बँककडे गहाण ठेवली. मात्र तो थकबाकीदार झाल्यामुळे बँकेने मुंबईतील नॅशनल कंपनी लवादाकडे दावा दाखल करून जागेचा ताबा मिळवला. मेहुलने 2016 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली. अशा कंपनीला सेझमध्ये जमीन कशी दिली, हा प्रश्‍नच आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com