मेहुणबारे ग्रा.पं.तर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस सुरवात 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

ग्रामस्थांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. अतिक्रमण काढण्यात आल्याने गल्ली मोकळी झाली आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - येथील ग्रामपंचायतीतर्फे वॉर्ड क्रमांक तीन व चारमध्ये आज पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण मोहिम राबवून "जेसीबी'च्या साहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. अतिक्रमण काढण्यात आल्याने गल्ली मोकळी झाली आहे. याप्रसंगी सरपंच संघमित्रा चव्हाण, ग्रामसेवक डी. आर. शिरतुरे, गाव विकास आघाडीचे प्रमुख भय्यासाहेब वाघ, अनिल देशमुख, मंगेश महाजन, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप देवरे, भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख, डॉ. फारूक शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: Mehunabare G.P. started the encroachment eradication campaign