मेहुणबारे परिसरात उसाचे क्षेत्र वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)  - परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मागीलवर्षी उसाचे क्षेत्र कमी होते. यावेळी या भागात एक हजार हेक्‍टरच्यावर ऊस लागवड होणार असल्याचे दिसत आहे. 

मेहुणबारे परिसरात दोन वर्षांपासून पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने उसाचे क्षेत्रही घटले होते. केवळ पाचशे हेक्‍टरच्या आसपास ऊस लागवड झाली होती. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने नदी, नाल्यांना पाणी आहे. शिवाय विहिरींच्या पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा एक हजार हेक्‍टरच्यावर ऊस लागवड होणार असल्याचे दिसत आहे. 

265 बेण्याची लागवड 
मेहुणबारेसह परिसरातील वरखेडे, तिरपोळे, दसेगाव, दरेगाव, लोंढे, जामदा, चिंचगव्हाण, मेहुणबारे आदी भागात बहुतांश शेतकरी 265 या जातीच्या बेण्याची लागवड करीत आहेत. हा ऊस चौदा महिन्यांनंतर तोडणीला येतो. या जातीच्या बेण्याच्या साखरेची रिकव्हरी देखील अतिशय चांगली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या या भागातून दोन हजार रुपये टन बेणे विकले जात आहे. या व्हरायटी बारा ते चौदा महिन्यांच्या असल्या तरी वजनाला चांगल्या आहेत. या जातीसोबतच रसवंतीसाठी लागणाऱ्या 419 या जातीच्या उसाचीही काही प्रमाणात लागवड होताना दिसत आहे. 

ठिबकला अत्यल्प प्रतिसाद 
पाण्याचे महत्त्व शेतकऱ्यांच्या लक्षात येत असले तरी अद्यापही या भागात पाहिजे त्या प्रमाणात ठिबकचा वापर होताना दिसत नाही. उसाला मुबलक पाणी देण्याची मानसिकता बदलत नसल्याने कृषी विभागाकडून ठिबक वापराचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले जात आहे. यंदा उसाची लागवड एकीकडे वाढत असल्याने ठिबकचाही वापर वाढवा, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, यंदा मेहुणबारे परिसरासह बेलगंगा साखर कारखाना परिसरात उसाचे क्षेत्र वाढणार असल्याने हा कारखाना सुरू करावा, अशी मागणी होत आहे. 

ऊस लागवडीचे तंत्र 
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लागवडीसाठी मळ्यातील बेणे वापरावे. तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यांतील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे. शक्‍यतो कोरड्या पद्धतीने लागवड करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल. मात्र, टिपरी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी हेक्‍टरी दोन डोळ्यांची 25 हजार टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास चार फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दोन फूट ठेवावे किंवा पाच फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवावे. अशा पद्धतीने हेक्‍टरी 13 हजार 500 ते चौदा हजार रोपे लागतील.

Web Title: Mehunabare sugarcane growing area in the region