PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 11 डिसेंबर 2019

 तिला मेसेज पाठवून हॉटेलमध्ये भेटण्यास आली तरच माझ्या मोबाईलमध्ये असलेले तुझे फोटो डिलीट करून टाकीन असे धमकावले. एकाच मोबाईलमधून त्याने तीन वेगवेगळ्या क्रमांकाचा वापर करून 24 मुलींना त्रास दिल्याचे तपासात समोर आले.

नाशिक : महाविद्यालयीन तरुणींचा सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्‍लिल मेसेज पाठविणे आणि त्यानंतर भेटण्यासाठी धमकावणाऱ्या मुसळगावच्या (ता. सिन्नर) विकृत तरुणास नाशिक सायबर पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने आतापर्यंत 24 मुलींना धमकावल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी सायबर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. 

Image may contain: one or more people, phone and indoor

असाप्रकारे त्रास द्यायचा तो विकृत....
युवराज बाजीराव डुंबरे असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता. 8) युवराजने पीडितेच्या मोबाईलवर व्हॉट्‌सऍपवरून अश्‍लिल मेसेज पाठविले. तसेच ऑनलाइनवरून सतत मेसेज पाठवित तिचा विनयभंग केला. त्याचप्रमाणे त्याने पीडितेला मेसेज पाठवून हॉटेलमध्ये भेटण्यास आली तरच माझ्या मोबाईलमध्ये असलेले तुझे फोटो डिलीट करून टाकीन असे धमकावले. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी तत्काळ तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे युवराजला जेरबंद केले. युवराजने एकाच मोबाईलमधून तीन वेगवेगळ्या क्रमांकाचा वापर करून 24 मुलींना त्रास दिल्याचे तपासात समोर आले. न्यायालयाने त्यास 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. 
 
Image may contain: 1 person, smiling, standing

युवराज बाजीराव डुंबरे (संशयित)

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

माझ्यासोबत लग्न केले नाही, तर फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन
आणखी एका घटनेत औरंगाबादच्या संशयिताने पीडितेचा ओळखीच्या माध्यमातून सोशल मीडियावर विनयभंग केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार औरंगाबाद येथील संशयितासमवेत तिची तीन वर्षांपासून ओळख होती. यातून संशयिताने पीडितेचे मोबाईलमध्ये छायाचित्र, व्हिडिओ काढले होते. त्यावरून त्याने माझ्यासोबत लग्न केले नाही, तर ते फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. संशयिताने पीडितेचा भाऊ व नातलगांना इंटरनेटवरून ते फोटो व व्हिडिओ पाठविले. याप्रकरणी सायबर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस याप्रकरणी संशयिताच्या मागावर असून, लवकरच अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले.  

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mentally disorder person blackmail women through WhatsApp messages crime Nashik Marathi news