.....तर त्यांना त्यांची जागाच दाखवून देऊ ; भुजबळ समर्थक का संतापले?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

भुजबळ परिवारावर जेव्हा संकटाची वेळ होती. त्यावेळेस स्वतःला कट्टर, एकनिष्ठ म्हणणारे संकटसमयी साहेबांना सोडुन गेलात. राजकीय सुडबुद्धीने व षडयंत्रातून कारवाई होत होती. अशा वेळी भुजबळ समर्थक खंबीर उभे होते. आज वेळ बदलली तर अनेक छोटे, मोठे कार्यकर्ते साहेबांच्या मागेपुढे करत नाशिक, मुंबई, पुणे येथे गराडा घालत आहेत. काहींनी तर थेट नागपूर वारी केली. अशा कार्यकर्त्यांना त्यांनी जागा दाखवण्यासाठी भुजबळ समर्थक खंबीर आहेत

नाशिक : राज्यात सत्तांतर झाले आणि छगन भुजबळ पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात आले. नाशिकच्या पालकमंत्री त्यांचीच नियुक्ती होण्याचे संकेत आहेत. या सत्तांतराने नाशिकचे राजकीय चित्र एकदम बदलले आहेत. महापालिकेपासून बहुतांश प्रमुख सत्तास्थाने भाजपच्या हाती आणि भाजपची सुत्रे माजी मंत्री गिरीश महाजनांच्या हाती. त्यामुळे जिल्ह्याचे सत्ताकेंद्र असलेल्या भुजबळांभोवती वावरणारे अनेक जन एका रात्रीत इकडून तिकडे गेले. त्यावर भुजबळ समर्थक मात्र चांगलेच संतापले आहेत. त्याच्या प्रतिक्रीया सोशल मिडीयावर उमटत आहेत.

मध असले की मधमाश्‍या जमा होतातच....

एव्हढेच नव्हे तर विविध सत्ताकेंद्रात भाजपला मदत करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा होती. आता पुन्हा चित्र पालटल्याने यातील अनेक जन पुन्हा आम्ही कसे एकानिष्ठ हे दाखविण्याची त्यांच्यात स्पर्धा आहे.येवला मतदारसंघात तर भुजबळ आल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी मावत नसल्याचे चित्र दिसले. मध असले की मधमाश्‍या जमा होतातच, याचा हा प्रत्यय होता.

....अन् भाजप मंत्र्यांना पायघड्या घालु लागले
राज्यात 2014 मध्ये सत्ता आणि मंत्रिपद गेले. भुजबळ कुटुंबावर राजकीय आकसातून ईडी तसेच अन्य कारवाई झाली. यामुळे काही संधिसाधू कार्यकर्ते दुरावले. भाजप मंत्र्यांना पायघड्या घालु लागले. अर्थात अनेक प्रामाणिक लोक या काळातही भुजबळ यांच्याबरोबर राहिले. या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी अखंड भुजबळ समर्थक या नावाने सोशल मिडीयावर दलबदलूंवर चांगलाच संताप व्यक्त करत इशारा देण्यास सुरवात केली आहे.

हळदीत नाचताना फक्त धक्का लागला..अन् थेट हल्लाच..थरार...

No photo description available.

कट्टर, एकनिष्ठ म्हणणारे संकटसमयी साहेबांना सोडुन गेलात....

भुजबळ परिवारावर जेव्हा संकटाची वेळ होती. त्यावेळेस स्वतःला कट्टर, एकनिष्ठ म्हणणारे संकटसमयी साहेबांना सोडुन गेलात. राजकीय सुडबुद्धीने व षडयंत्रातून कारवाई होत होती. अशा वेळी भुजबळ समर्थक खंबीर उभे होते. आज वेळ बदलली तर अनेक छोटे, मोठे कार्यकर्ते साहेबांच्या मागेपुढे करत नाशिक, मुंबई, पुणे येथे गराडा घालत आहेत. काहींनी तर थेट नागपूर वारी केली. अशा कार्यकर्त्यांना त्यांनी जागा दाखवण्यासाठी भुजबळ समर्थक खंबीर आहेत. ज्यांनी संकटसमयी व पराभवाच्या वेळी भुजबळ फार्म समोर फोडलेल्या फटाक्‍यांचा आवाज आम्ही विसरलेलो नाही. अखंड भुजबळ समर्थक त्यांना त्यांची जागा दाखवणार. असे संदेश मोठ्या प्रामणावर व्हाटस्‌ऍप, फेसबुक, ट्‌विटरसह सोशल मिडीयावर रोजच व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे दलबलूंना त्याची धास्ती वाटू लागली आहे.

PHOTOS : माणुसकी निभावून दाखवूयाच!..'या' तरुणांचं ठरलं तर... 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Message from Chhagan Bhujbal supporters viral on social media political nashik marathi News